Success Story: मिस इंडिया फायनलिस्ट, मॉडेलिंग सोडून दिली UPSC; पहिल्याच प्रयत्नात...

Success Story IFS officer Aishwarya Sheoran: ऐश्वर्या शेरॉन मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या. पण त्यांनी मॉडेलिंगचे करिअर सोडले आणि कोणतेही कोचिंग न लावता पहिल्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली.

Pravin Dabholkar | Updated: Feb 12, 2024, 01:46 PM IST
Success Story: मिस इंडिया फायनलिस्ट, मॉडेलिंग सोडून दिली UPSC; पहिल्याच प्रयत्नात... title=
IFS officer Aishwarya Sheoran

Success Story IFS officer Aishwarya Sheoran: एखाद्या आवडत्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी गेल्यावर आयुष्यात खूप काही मिळवल्याची अनेकांची भावना असते. पण करिअरच्या सर्वोच्च स्थानी असताना देखील दुसरे आवडीचे क्षेत्र निवडणे, त्यासाठी मेहनत करणे आणि त्यातील महत्वाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणे, हे फार कमी जणांना जमते. ऐश्वर्या शेरॉन हे नाव त्यातीलच एक आहे. ऐश्वर्या शेरॉन मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या. पण त्यांनी मॉडेलिंगचे करिअर सोडले. कारण त्यांना यूपीएससी परीक्षा द्यायची होती. यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. आणि त्यांच्या प्रयत्नांना यशदेखील आले. महत्वाचे म्हणजे त्यांनी यासाठी कोणतेही कोचिंग लावले नव्हते. त्यांच्या या यशाची कहाणी लाखो यूपीएससी एस्पिरंटसाठी अत्यंत महत्वाची आहे. या प्रेरणादायी कहाणीबद्दल जाणून घेऊया. 

राजस्थानच्या ऐश्वर्या शेरॉन यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा पास केली होती. त्या राजस्थान जिल्ह्यातल्या चूरु जिल्ह्यात राहाणाऱ्या असून करिमनगर एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर अजय कुमार यांची ती मुलगी आहे. त्यांच्या घरात लहानपणापासूनच मिलिट्रीचे शिस्तिचे वातावरण होते. त्यामुळे राष्ट्रसेवेत करिअर करावे अशी इच्छा ऐश्वर्या यांच्या मनात निर्माण झाली.

2014 मध्ये ऐश्वर्या शेरॉन यांनी क्लीन अँड क्लीअर फेस फ्रेश स्पर्धेत अंतिम यादीत प्रवेश केला होता. तर 2016 मध्ये त्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर होत्या. ऐश्वर्या मॉडलिंग करिअरमध्ये त्या सर्वोच्च स्थानी होत्या. येथून त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती. पैसा, प्रसिद्धी त्यांच्या पायाशी लोळण घालत होती. पण त्यांचे स्वप्न यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे, हे होते. हे स्वप्न पूर्ण करण्याची वाट खूप  खडतर होती. खूप मेहनत घ्यावी लागणार होती. पण त्यांनी निर्णय घेतला आणि खरा करुन दाखवला. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 93 वा क्रमांक पटकावला.  देशातल्या सुंदर IAS अधिकाऱ्यांपैकी ऐश्वर्या शेरॉन या एक आहेत.

ऐश्वर्या यांनी यूपीएससी परीक्षा द्यायची होती. त्यामुळे त्यांचा परिवार दिल्ली येथे स्थायिक झाला. चाणाक्यपुरीच्या संस्कृती शाळेतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत त्यांना 97.5 टक्के मिळाले. यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांनी मॉडेलिंग स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. 2016 मध्ये त्या मिस इंडिया स्पर्धेच्या फायनलिस्ट होत्या. त्याआधी त्यांच्याकडे 2015 मध्ये मिस दिल्लीचे क्राऊन होता. 2014 मध्ये त्यांच्याकडे मिस क्लिन अॅण्ड केअर फ्रेश फेसचा क्राऊन होता. 

तब्बल 16 सरकारी नोकऱ्यांवर सोडलं पाणी,  तृप्तीने IPS बनून पूर्ण केलं स्वप्न 

2018 मध्ये आयआयएम इंदौरमध्ये त्यांची निवड झाली होती. पण त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळा विचार सुरु होता. ग्मॅलरस जगापासून दूर जाऊन आयएएएस ऑफिसर बनवून देशसेवा करायची त्यांची इच्छा होती. 

खूप मेहनत करुन त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्यांना 93 वा रॅंक मिळाला. विशेष म्हणजे त्यांनी इतरांप्रमाणे कोणतेही कोचिंग लावले नव्हते. घरी 10 महिने सेल्फ स्टडी करुन त्यांनी हे यश मिळवले होते. त्यानंतर ऐश्वर्या आयएफएस अधिकारी बनल्या. भारताच्या परदेश व्यवहार मंत्रालयात त्यांना पोस्टिंग मिळाले.

बॅंकेची नोकरी सोडून छोट्या दुकानातून आईसोबत इडली विकायला सुरुवात, आता दिवसाला..