स्वामी समर्थांच्या नावावरुन मुला मुलींची खास युनिक नावे, कायम राहिल कृपाशिर्वाद

Baby Boy and Girl Names on Swami Samarth : श्री स्वामी समर्थाजी आज 146 पुण्यतिथी आहे. आज या निमित्ताने महाराजांच्या नावावारुन मुलांसाठी खास नावे पाहूया. यामुळे सतत राहिल स्वामींचं स्मरण. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 8, 2024, 11:36 AM IST
स्वामी समर्थांच्या नावावरुन मुला मुलींची खास युनिक नावे, कायम राहिल कृपाशिर्वाद  title=

Baby Boy Names on Swami Samarth : श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आज 6 मे रोजी 146 वी पुण्यतिथी. अक्कलकोट येथे महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा संपन्न होतो. यावेळी लाखो भाविक येथे जातात. श्री स्वामी समर्थांच्या विचारांवर चालणारे अनेक भाविक आहेत. श्री स्वामी समर्थांचे सतत स्मरण राहावे आणि आपल्या बाळावर त्यांची कृपादृष्टी असावी असं अनेकांना वाटतं. अशावेळी तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या नावांवरुन ठेवा मुलांची नावे. 

श्री स्वामी समर्थांच्या नावावरुन मुलांची नावे आणि अर्थ 

  • समर्थ - शक्तिशाली, सक्षम, प्रतिभावान असा याचा अर्थ
  • सार्थक - हृदय असा देखील याचा अर्थ आहे. हृदयात राहतील स्वामी. 
  • स्वामी - स्वामी हे स्वामींच्या नावावरुन आलेले नाव आहे. 
  • समर्थ्य - समर्थ्य या नावाचा अर्थ आहे ताकदवान, स्वामींच्या आशिर्वादाने सजलेलं हे नाव 
  • साईसार्थक - साईसार्थक ही दोन नावे आहेत. चांगले कार्य तसेच याचा अर्थ स्वामींच्या नावावरुन मुलांसाठी हे खास नाव. 
  • संकल्प - संकल्प हे देखील अतिशय युनिक नाव आहे. स्वत: ची दृढनिश्चय ओथ असा या नावाचा अर्थ आहे. 
  • समन्वय - संवाद साधणारा, मोठी व्यक्ती असा या नावाचा अर्थ आहे. स्वामींच्या नावावरुन ठेवा हे नाव. 
  • सौमित्र - सुमित्राचा पुत्र भगवान लक्ष्मण" किंवा "चांगला मित्र" असा देखील याचा अर्थ आहे. 

स्वामींच्या नावावरुन मुलींची नावे 

  • स्वामिनी - उत्तम सहचारीणी असा या नावाचा अर्थ आहे. स्वामींच्या नावावरुन ठेवा हे नाव. 
  • श्रीजा - देवी लक्ष्मी असं या नावाचा अर्थ आहे. स्वामींच्या आशिर्वादाने परिपूर्ण असं हे नाव
  • स्वरुचि - चांगली व्यक्ती किंवा उत्तम आनंद असा या नावाचा अर्थ आहे. महाराजांच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे. 
  • स्वरूपा - स्वरुपा हे नाव अतिशय खास आहे. सुंदर व्यक्तिमत्तव असा या नावाचा अर्थ आहे. 
  • स्वलेखा - स्वलिखीत, स्वामींच्या आशिर्वादातून हे नाव आहे. 
  • श्रीदेवी - श्रीदेवी या नावाचा अर्थ आहे श्री आणि देवी ही दोन्ही नावे या नावात आहेत. 
  • स्वामिनिका - स्वामिनिका या नावाचा अर्थ स्वामींचा आशिर्वाद. 
  • स्वर्णाली - स्वरांचा अर्थ असा या नावाचा अर्थ आहे. स्वामींच्या नावावरुन मुलींसाठी हे खास नावं.
  • श्रीहर्षा - शांत मन किंवा आनंदाचा देव असा या नावाचा अर्थ आहे. 
  • स्वलीला - स्वलीला म्हणजे स्वामींची कृपा.. या नावाचा विचार मुलींसाठी करु शकतो.