Summer special List उन्हाळ्यात सहलीला जाताय, 'या' वस्तू सोबत ठेवा

मार्च महिन्यापासून हवेतील तापमान वाढण्यास सुरुवात होते. कडाक्याच्या उन्हात बाहेर जाताना चक्कर येणं आणि थकवा यासारख्या होत असतात. त्यामुळे भर उन्हातून बाहेर जााताना सोबत कोणत्या वस्तू असायला हव्यात ते जाणून घेऊयात...  

Updated: Mar 19, 2024, 07:14 PM IST
Summer special List उन्हाळ्यात सहलीला जाताय,  'या' वस्तू सोबत ठेवा   title=

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुलांच्या परिक्षा संपतात त्यामुळे बरेच जण उन्हाळ्यात सहलीला जाण्याचा प्लान करतात.  अनेकांना उष्णतेचा त्रास होतो. उन्हाचा उकाडा वाढल्यावर बऱ्याच जणांच्या तब्बेतीच्या तक्रारी सुरू होतात. 

सनस्क्रीन 
वातावरणातील तापमान वाढल्यावर सूर्याच्या अतिनील किरणांचा  त्वचेशी थेट संबंध येतो. ही अतिनील किरणं त्वचेच्या संपर्कात येताच त्वचा काळवंडणं, कोरडी पडणं तसंच जळजळ होणं या समस्या उद्भवतात.  सनस्क्रीन त्वचेचं सूर्य किरणांपासून बचाव करतं. सर्वसाधारण SPF 30 असलेले सनस्क्रीन कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी वापरलं जातं. 

टोपी
उन्हाचा त्रास होऊ नये याकरीता डोक्यावर टोपी घालायला विसरू नका. सध्य़ा बाजारात वेगवेगळ्या डीझायनर ट्रेंडीग टोप्या मिळतात. या टोप्यांमुळे वेअर केलेल्या कपड्यांना छान लुक मिळतो. टोपी वापरल्याने चक्कर येणं आणि थकवा जाणवणं यासारखे त्रास होत नाही.  

मोकळे कपडे
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ऊन्हाळ्यात दिवसा बाहेर जाताना आणि रात्री झोपताना मोकळे आणि कॉटनते कपडे वापरावेत. घामामुळे त्वचेते विकार होण्याची शक्याता जास्त असते, त्यामुळे जर घट्ट कपडे वापरण्या ऐवजी मोकळे आणि सुती कपडे वापरले तर त्वचा विकार होत नाही. 

पाण्याची बाटली
वातारणातील वाढत्या तापमानामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे घसा कोरडा पडणं, चक्कर येणं थकवा जाणवणं याासारखे त्रास होतात. त्यामुळे बाहेर फिरताना पाण्याची बाटली सोबत घ्यायला विसरू नका. 

अत्यावश्यक वस्तू 
ऊन्हाळा असो किंवा कोणताही ऋतू बाहेर जाताना किंवा सहलीला जाताना शॅम्पू, कंडिशनर आणि बॉडी वॉश या वस्तू प्तत्येकाजवळ असणं महत्त्वाचं आहे. त्यासोबतच धुळीमुळे खराब झालेला चेहरा स्वच्छ करण्यासाठी ओले वाईप सोबत असणं महत्त्वाचं आहे. 

 शूज
सन टॅनिंगपासून पायांचं संरक्षण करण्याकरीता शूजचा वापर करावा. विशेषत: पांढऱ्या रंगांच्या शूजमुळे सूर्यकिरणं परावर्तित होतात. त्यामुळे सूर्याच्या हानीकारक किरणांमुळे पायांचं संरक्षण होण्यास मदत मिळते. 

आवळ्याची सुपारी 
ऊन्हाळ्यात आवळ्याचं सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. गरमीमुळे शरीरातील आम्लपित्त वाढतं. आवळ्याचा रस किंवा आवळ्याची शरीरात थंडावा निर्माण करतं. जर सतत उलटी आणि मळमळीचा त्रास होत असेल तर आवळ्याची गुणकारी मानलं जाते.