उन्हाचा तडाखा वाढलेला असताना Full Speed पंखा लावून झोपणे योग्य आहे का? अभ्यासात काय म्हटलंय...

Summer Tips :  उन्हाळा सुरु झाला आहे, वातावरणात प्रचंड बदल झाला आहे. अशावेळी डोक्यावरचा पंखा फुल स्पीडला लावून झोपणे योग्य आहे का? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 26, 2024, 04:35 PM IST
उन्हाचा तडाखा वाढलेला असताना Full Speed पंखा लावून झोपणे योग्य आहे का? अभ्यासात काय म्हटलंय...  title=

थंडीचे दिवस जाऊन आता उन्हाळा सुरु झाला आहे. होळी पेटवल्यानंतर आता वातावरणातही कडक उष्णता अनुभवायला मिळत आहे. हवामान खात्यानेही उन्हाचा तडाखा बसायला सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे. असं असताना घरांमध्ये पंख्याशिवाय बसणे कठीण झाले आहे. पण वातावरणाच्या या बदलांमध्ये लोकांना प्रश्न पडतोय की, डोक्यावर फिरणारा पंखा फुल स्पीडला करून लावणे योग्य आहे का? 

पंखा फास्ट करुन झोपण्याचे फायदे

पंखा फास्ट करुन झोपण्याने झोप चांगली लागते आणि अनिद्रेच्या समस्या दूर होतात. 
उन्हाळ्यामुळे खोलीचे तापमान बिघडणार अशावेळी पंखा लावल्यामुळे खोलीचे तापमान योग्य राहते. यामुळे भीती आणि अस्वस्थता दूर होते. 
पंखा लाव्यामुळे मच्छर आणि माशांचा त्रास कमी होतो.
पंखा लावल्यामुळे उन्हाळ्यात येणाऱ्या घामाचा दुर्गंध दूर होतो. 

पंखा फास्ट करुन झोपण्याचे दुष्परिणाम 

वातावरणातील बदल शरीराला स्विकारायला थोडा वेळ लागतो. अशावेळी पंखा फूल स्पीडमध्ये करणे शरीरासाठी घातक ठरू शकते. 
अचानक डोक्यावरील पंख्याची हवा वाढल्यास सर्दी, खोकल्या, शिंका येणे यासारखे प्रमाण वाढते. 
पंख्याच्या हवेत झोपण्याचे अनेक तोटे आहेत. पंख्याच्या हवेत जास्त वेळ झोपल्याने श्वास घेण्यास त्रास होतो, सर्दी आणि खोकला होतो, तर पंख्याची हवा घाम येण्यापासून वाचण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी चांगली असते, परंतु जास्त वेळ पंखा चालू ठेवून झोपणे टाळावे.

रात्रभर पंखा चालवल्याने आरोग्यावर वाईट परिणाम 

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात दिवसा तुमच्या खोलीत पडदे ठेवा. असे केल्याने तुमच्या खोलीचे तापमान कमी राहील आणि यासोबतच तुम्हाला पंख्यामुळे होणाऱ्या त्रासापासून आराम मिळेल. रात्रभर पंखा लावून झोपल्याने आरोग्यावर सर्वात वाईट परिणाम होतो. तज्ज्ञांनी सांगितले की, रात्रभर पंखा चालू असल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.

जर तुम्ही रात्रभर पंखा चालू ठेवून झोपलात तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी अंगदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत पंख्याखाली झोपणे टाळावे. थंड हवेमुळे स्नायू ताणले जातात आणि तुम्हाला आणखी वेदना सहन कराव्या लागतात. तुम्हाला तुमच्या मानेमध्ये वेदनाही जाणवू लागतील. अस्थमाच्या रुग्णांनी हे अजिबात करू नये. यामुळे तुम्हाला दिवसा जास्त शिंका येईल, तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होईल.

या गोष्टी देखील टाळा

बदलत्या हवामानात आपण आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. अशा परिस्थितीत बदलत्या हवामानात दही खाणे टाळावे. आयुर्वेदानुसार दह्याचा शीतल प्रभाव असतो. यामुळे तुम्हाला थंडीचा त्रास होऊ शकतो. रात्री दही न खाण्याचा प्रयत्न करावा. यासोबतच रात्री भात खाणे टाळावे कारण रात्री भात खाल्ल्याने कफ येणे, घशात जळजळ होणे, सूज येणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तज्ज्ञ रात्री भात खाण्याऐवजी दिवसा खाण्याचा सल्ला देतात.

उन्हाळ्यात पंख्याच्या हवेला पर्याय

  • रात्री झोपताना कॉटनच्या बेडशीटवर झोपा आणि हलके सुती कपडे घाला.

  • खोली थंड ठेवणारी झाडे खोलीत लावली जाऊ शकतात जसे की अरेका पाम ट्री किंवा कोरफड इ.

  • दिवसा खोलीचे दरवाजे उघडे ठेवा जेणेकरून हवेचे क्रॉस वेंटिलेशन योग्य राहील.

  • दिवसा उष्णता येऊ नये म्हणून खोलीत सुती पडदे वापरा आणि बाहेर काळे पडदे वापरा.

  • कूलिंग मॅट्रेस विकत घ्या आणि तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवा जेणेकरून तुम्हाला कमी गरम वाटेल.