Summer Parenting Tips : लहान मुलांना AC आणि Cooler समोर झोपवणं योग्य आहे का?

AC And Cooler Safe For Newborn : उन्हाळा प्रचंड वाढला आहे. यामुळे मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांची देखील चिडचिड होते. अशावेळी नेमकं काय करावं? मुलांना या सगळ्याची सवय लावणे योग्य आहे का?  

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 26, 2024, 12:33 PM IST
Summer Parenting Tips : लहान मुलांना AC आणि Cooler समोर झोपवणं योग्य आहे का? title=

उन्हाचा कहर सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत, उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी, जवळजवळ प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात कूलर किंवा एसी सुरु करतो. या कडक उन्हापासून दिलासा देण्यासाठी एसी आणि कुलरची थंड हवा प्रभावी ठरते. पण ही हवा तुमच्या तान्ह्या बाळासाठी सुरक्षित आहे का? आपल्यापैकी अनेकांच्या मनात हा प्रश्न पडतो की एसी आणि कुलरची हवा सुरक्षित आहे का? विशेषत: मुलांना सुरक्षित ठेवायचे, असे प्रश्न पालकांच्या मनात खूप राहतात. तुमच्याही मनात असा प्रश्न असेल तर आज या लेखात तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर अगदी सहज मिळू शकते.

तज्ज्ञ काय म्हणतात?

First Parenting वरच्या लेखात डॉ. आरवा भवंगरवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात तुम्ही बाळाला एसी किंवा थंड हवेत ठेवू शकता. एसी आणि थंड हवा बाळासाठी सुरक्षित आहे. विशेषतः, गरम आणि वारा नसलेल्या जागेपेक्षा थंड वातावरण बाळासाठी अधिक सुरक्षित आहे. त्यामुळे उन्हाळ्यात बाळाला एसी किंवा थंड हवेत ठेवता येते.

खोलीचे तापमान सामान्य कसे राहील याकडे लक्ष द्या. खोली खूप थंड असेल तर एसी किंवा कुलर बंद करा. आपण असे न केल्यास, बाळाच्या शरीराचे तापमान कमी होऊ शकते. यासोबतच खोलीत एसी किंवा कुलर चालवताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ज्यामुळे बाळाचे आरोग्यही चांगले राहील 

एसी किंवा कुलर लावताना या गोष्टी लक्षात ठेवा?

खोलीच्या बाहेरचे तापमान कूलर किंवा एसीच्या थंडपणावर पडते. त्यामुळे सीझननुसार कुलर किंवा एसी चालवा. तुम्ही असे न केल्यास, खोली खूप थंड किंवा गरम होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या बाळाला अस्वस्थता येऊ शकते.

  • डॉक्टर म्हणतात की, बाळाला कूलर किंवा एसी रूममध्ये झोपवताना खोलीचे तापमान 23 ते 26 दरम्यान ठेवावे. एसीचे तापमान यापेक्षा कधीही कमी करू नका. एसीचे तापमान कमी केल्यास मुलाची तब्येत बिघडू शकते.
  • कुलर चालवल्यास दार किंवा खिडकी उघडी ठेवा. त्यामुळे हवेची हालचाल सुरू राहते. यामुळे बाळाला निरोगी हवा मिळू शकते.
  • बाळाला कधीही कूलर किंवा एसी हवेच्या थेट संपर्कात येऊ देऊ नका. एसी किंवा कुलर असलेल्या खोलीत मुलाला नेहमी सुती कापडाने झाकून ठेवा. यासाठी त्यांचे हात-पाय गुंडाळून ठेवावेत. हे तुमच्या बाळाला थंड वाऱ्यापासून वाचवेल.
  • बाळाला झोपवताना, त्याला कूलरकडे तोंड देऊ नका. त्यामुळे त्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
  • तसेच एसी आणि कुलर स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. 

 डॉक्टर म्हणतात की तुम्ही बाळाला एसी किंवा कुलरच्या थंड हवेत ठेवू शकता.  खोलीचे तापमान सामान्य राहते हे लक्षात ठेवा. कूलर किंवा एसीची हवा किंवा तापमान मुलाच्या गरजेपेक्षा जास्त कधीही वाढवू नका. त्याच वेळी, जर तुमच्या बाळाला एसीमुळे कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर अशा परिस्थितीत नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या.