Big News : निलेश लंके यांचा आमदार पदाचा राजीनामा; कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केला मोठा निर्णय

निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शरद पवार गटात प्रवेश करुन लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. 

Updated: Mar 29, 2024, 07:53 PM IST
Big News : निलेश लंके यांचा आमदार पदाचा राजीनामा; कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केला मोठा निर्णय title=

MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके (Nilsesh Lanke)  यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला आहे.  निलेश लंके हे  पारनेरचे आमदार आहेत. आमदार निलेश लंके राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश करमार अशी चर्चा सुरु होती. अखेर लंके यांनी राजीनामा दिला आहे. कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. 

राजीनामा दिल्यानंतर निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. दक्षिण नगरमधून निलेश लंके लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा देखील रंगली आहे. लंके नगरमधून लढल्यास त्यांची लढत सुजय विखेंशी होणार आहे. लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला नाही तर कारवाई करणार असा इशारा सुनील तटकरेंनी दिला होता. यामुळे आता त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंना सूचक इशारा दिला होता. लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असं त्यांनी बजावल होतं. लंकेनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली होती त्यानंतर अजित पवार यांनी हा इशारा दिला होता. 

निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक

आपण लोकसभा निवडणूक लढवावी ही जनभावना असल्याचं आमदार निलेश लंके म्हणाले होते. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील त्यांनी ही भूमिका मांडली. लोकसभा लढवावी ही जनतेची इच्छा असली तरीही, लोकांचा सूर जाणून घेऊनच आपण निवडणुकीचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

निलेश लंकेंच्या संभाव्य दक्षिण नगर उमेदवारीवरुन जयंत पाटील-अमोल मिटकरी यांच्यात कलगीतुरा रंगला होता. लंके उभे राहिले तर निवडून येतील असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला होता. तर, लंकेंच्या रुपात एका गरीब माणसाचा बळी दिला जातोय..असा टोला अमोल मिटकरींनी लगावला होता. निलेश लंकेंना शरदचंद्र पवार पक्षाकडून दक्षिण नगरमधून उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे, त्यावरुनच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात कलगीतुरा रंगला होता.