सोनं 70 हजारांपलीकडे; गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी मोजावी लागणार विक्रमी रक्कम

Gold Price Cross 70 Thousand : सोन्याच्या दरात गेल्या 24 तासांत 2 हजार रुपयांनी वाढ, सोनं सत्तरीच्या पार... आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 29, 2024, 08:58 AM IST
सोनं 70 हजारांपलीकडे; गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी मोजावी लागणार विक्रमी रक्कम title=

Gold Price : जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर अगदी 70 हजार पार पोहचले आहे. लग्नसमारंभात किंवा आता गुढी पाडव्या सारख्या सण-वाराला सोने खरेदीचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. 

24 तासात सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी आणि गुंतवणुकीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे आजचे भाव 70 हजार 100 रुपये प्रतितोळे जीएसटी सह नोंदवले गेले आहे. महत्त्वाच म्हणजे आज पर्यंत सोन्याच्या दराचा हा सगळ्यात उच्चांक भाव आहे. 

सोने चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे. 24 तासांत दोन हजारांनी वाढलेल्या सोने खरेदीकडे लोकं पाठ फिरवणार का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोन्याच्या दराने 70 हजारांचा आकडा पार केल्यानंतर खरेदी करण्याचा कल कमी होताना पाहायला मिळत आहे.

ग्राहकांची सोनं खरेदीकडे पाठ 

सोन्याच्या दरात तब्बल दोन हजारांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. वाढत्या सोन्याच्या दराने सत्तरी गाठल्यानंतर ग्राहकांनी मात्र सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. हे चित्र जळगाव सुवर्ण नगरीत पाहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर अमेरिकेतील फेडरल बँकांनी व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्यामध्ये करण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहण्यात येत आहे.