Lok Sabha Election 2024 LIVE Update: 'महाराष्ट्र खजिना चावी अजित पवारांकडे' - देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Nivadnuk 2024: सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात लागोपाठ दुसऱ्या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी कमी राहिल्याने अनेक तर्कवितर्क लढवणे सुरु झाले आहे. निवडणुकी संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉक फॉलो करा. 

Lok Sabha Election 2024 LIVE Update: 'महाराष्ट्र खजिना चावी अजित पवारांकडे' - देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Election 2024: देशात 18व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. तर 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील देशातील एकूण 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 89 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे ला असणार आहे. दरम्यान निवडणुकी संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉक फॉलो करा. 

28 Apr 2024, 19:19 वाजता

रत्नागिरीत महाविकास आघाडीच्या जाहीर सभेला सुरुवात. उद्धव ठाकरे यांचे काही वेळात होणार. आगमन व्यासपीठावर मविआचे उमेदवार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, उपस्थित.

28 Apr 2024, 17:12 वाजता

2019 विधानसभा निवडणुकीत पडलेल्या सव्वादोन लाख मता पेक्षा एक मत कमी पडले तर याला आमदार बबनराव शिंदे, आणि आमदार संजय शिंदे जबाबदार-आरोग्य मंत्री तानाजी सावंत 

28 Apr 2024, 16:08 वाजता

'महाराष्ट्र खजिना चावी अजित पवारांकडे' - देवेंद्र फडणवीस

28 Apr 2024, 14:31 वाजता

सरकारला लोकसभा, विधानसभा न घेण्याची दुर्बुद्धी होऊ शकते

सासवडच्या सभेतून शरद पवारांनी मोदी-भाजपवर घणाघात करताना भिती व्यक्त केलीय.. मोदी आणि सहकारी ज्या पद्धतीनं देश चालवतायत त्यावर चिंता आहे असं शरद पवारांनी म्हटलंय. उद्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक न घेण्याची दुर्बुद्धी सरकारला सुचू शकते.. अशी भिती पवारांनी व्यक्त केलीय.. 

28 Apr 2024, 14:28 वाजता

मतदारांमध्ये जनजागृतीसाठी भोपाळमध्ये तृतीयपंथियांचा फॅशन शो...मतदान करण्याचं आवाहन

28 Apr 2024, 13:28 वाजता

भिवंडीचे मविआचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रेंनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. तुतारी चिन्हावरच निवडणूक लढणार यात कोणतीही किंतु परंतु नाही, असं त्यांनी म्हटलंय. बाळ्या मामांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याचं बोललं जातं होतं.

28 Apr 2024, 13:08 वाजता

'...याचा अर्थ मोदींना महाराष्ट्राची भीती वाटते'- संजय राऊत

देश वाऱ्यावर सोडून पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात सभा घेत असतात. मोदी गेल्या 10 वर्षापासून खोटं बोलत आहेत. बघावं तेव्हा मोदी महाराष्ट्रात असतात. याचा अर्थ मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राची भीती वाटते.  मोदींच्या अंगात औरगंजेब संचारलाय आहे. एवढचं नाही तर नोटाबंदी आणि लॉकडाऊनमुळे महिलांना मंगळसूत्र विकायला लागलं, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेयं. 

28 Apr 2024, 12:39 वाजता

मुंबईतील नाकाबंदीत सापडलं पैशांचं घबाड 

लोकसभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी दक्ष असलेल्या निवडणूक भरारी पथकाकडून शनिवारी रात्री मुंबई उपनगर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. भांडूपमध्ये शनिवारी रात्री निवडणूक भरारी पथकाकडून नाकेबंदी करुन गाड्यांची तपासणी करत असातना सोनापूर सिग्नलवर एका गाडीत मोठ्याप्रमाणावर रोकड आढळून आली. गाडीत आढळून आलेली रक्कम ही जवळपास तीन ते साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे समजते. 

28 Apr 2024, 12:29 वाजता

ठाणे लोकसभेसाठी 'हे' नाव आघाडीवर !   

ठाणे लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रताप सरनाईक आणि रविंद्र फाटक हे देखिल उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत, असं असताना आता अचानक नरेश म्हस्के यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली. आज किंवा उद्या शिवसेनेच्या उर्वरीत उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. यावेळी काही नावांमध्ये बदल ही होण्याची शक्यता नाकारतां येत नाही.

28 Apr 2024, 11:52 वाजता

आऊटर मणिपूरमधील ६ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदानाचे आदेश...३० एप्रिलला होणार मतदान