Loksabha Election 2024 Live Updates: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून यामिनी जाधव यांचं नाव निश्चित?

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात अनेक नेत्यांच्या सभा होणार आहेत. तर बरेच उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्रात आज होणाऱ्या सभांमध्ये अगदी केंद्रीय नेत्यांपासून ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याही सभा होणार आहेत. यावरच नजर टाकूयात... 

Loksabha Election 2024 Live Updates: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून यामिनी  जाधव यांचं नाव निश्चित?

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीसाठीचा पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर निवडणुकीला अधिक रंग चढू लागला आहे. आज महाराष्ट्रातील वेगवगेळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या जाहीर सभा आणि रो शो होणार आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अकोल्यातील सभेचाही समावेश आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही सभा आज होणार आहेत. जाणून घेऊयात आजच्या दिवसभरातील घडामोडी...

23 Apr 2024, 20:11 वाजता

निवडणुकीनंतर ते पुन्हा पवार साहेबांकडे येतील आणि पाया पडतील, चूक झालं म्हणतील. अशी टीका जयंत पाटील हे सुनील तटकरे यांच्यावर करत असताना शरद पवार यांनी हात हलवत नकार दिला.

23 Apr 2024, 19:45 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार म्हणून भायखळा विधान सभेच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांचे नाव जवळपास निश्चित झालंय.काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीत दक्षिण मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यामिनी यशवंत जाधव यांच्या नावाला पसंती दिली.

23 Apr 2024, 19:21 वाजता

शिवसैनिकांनी थांबवला नारायण राणेंचा प्रचार

 

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्गमधील भाजप उमेदवार नारायण राणेंच्या प्रचार पत्रकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो नसल्यानं शिवसैनिक नाराज झालेत... त्यांनी राणेंचा प्रचार थांबवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... आधीच हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यानं शिवसेना शिंदे गटात नाराजी आहे. त्यात प्रचार साहित्यातून बाळासाहेब ठाकरे आणि दिघेंचा फोटो नसल्यानं नाराजीत भर पडलीय... दरम्यान, शिवसैनिकांनी अजिबात प्रचार थांबवलेला नाही, असं स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Apr 2024, 19:12 वाजता

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव  नाका बंदीवर हिंगोली लोकसभा क्षेत्राचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नागेश आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा याने पोलिसांसोबत सोबत हुज्जत घालत शिवीगाळ केली आहे. नाक्यावर गाडी का थांबविली? या कारणावरून ही शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी उमरखेड पोलिसात तक्रार करण्यात आली असून कृष्णा आष्टेकर विरोधात 353 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

23 Apr 2024, 18:36 वाजता

23 Apr 2024, 18:19 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates: अकोल्यात महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारसभा घेतली. आपल्या भाषणात अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. विरोधकांनी राम मंदिर बनण्यापासू अडकून ठेवलं होतं. पण नरेंद्र मोदी दोनवेळा पंतप्रधान झाले आणि त्यांनी अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाची कावड यात्रा घेऊन निघाले आहेत. पंतप्रधान मोदींनी भारतातून आतंकवात संपवला, तर काँग्रेसने केवळे मताचं राजकारण केल्याचा आरोप अमित शाहंनी केलाय.

23 Apr 2024, 17:01 वाजता

बारामतीमध्ये हर्षवर्धन पाटलांचं बंड लोकसभेपुरतं शमलं असलं तरी त्यांचा इंदापूर विधानसभेवरील दावा कायम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून तसा शब्द मिळालेला असल्यामुळेच आपण त्यांच्यासोबत असल्याचं हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी म्हटलंय.

23 Apr 2024, 16:37 वाजता

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर बसला लागली आग..बस मध्ये एकूण 35 ते 40 प्रवाशी होते...बस पेटल्याने प्रवाशांनी तातडीने गाडीतून पडले बाहेर 

23 Apr 2024, 16:35 वाजता

उद्धव ठाकरेंच्या मुलाने दिलेली शिवी मला नसून शेतकऱ्याला शिवी आहे. मराठा समाजाला शिवी आहे.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

23 Apr 2024, 16:08 वाजता

शिरुरचे उमेदवार शिवाजी अढळराव पाटील हे २५ तारखेला आपला उमेदवारी अर्ज भरतील.यासाठी महायुतीने प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर डेक्कनजवळच्या नदी पात्रात मोकळ्या जागेवर सभा देखील होणार- आनंद परांजपे