Loksabha Election 2024 Live Updates : काँग्रेसला मोठा धक्का, रश्मी बर्वे यांचा निवडणूक अर्ज रद्द

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभेसाठी महाविकास आघाडीसह महायुतीचा जागावाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. वाचा सर्व राजकीय घडामोडी एका क्लिकवर...

Loksabha Election 2024 Live Updates : काँग्रेसला मोठा धक्का, रश्मी बर्वे यांचा निवडणूक अर्ज रद्द

Loksabha Election 2024 Live : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली असली तरी राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एकीकडे मविआमधील जागावाटप पूर्ण होण्याआधीच ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे मविआमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या यादीवर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे महायुतीतील जागावाटपाचा सस्पेन्स लवकरच संपणार असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे दिवसभरात मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत. इथं पाहा वेगवान अपडेट.... 

28 Mar 2024, 10:28 वाजता

Loksabha Election 2024 Live : भाजपचे कार्यालय फोडणाऱ्याला तिकीट - बच्चू कडू

"ज्यांनी भाजपचे कार्यालय फोडले त्याला तिकीट मिळाल्याची टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीवरुन बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदीजींना ज्यांनी शिवीगाळ केली त्यांनाच तिकीट मिळालं. राणांनी आता हात जोडू नये. तसेच मुख्यमंत्र्यांना महायुतीतून बाहेर पडण्याची परवानगी मागायची गरज नाही. आता आमचं एकच लक्ष आहे भाजपाचा उमेवादर नवनीत राणा यांना पाडणे. अबकी बार चारशे पार ही घोषणा आहे पण एखादी जागा पडली तरी काही फरक पडणार नाही," असे बच्चू कडू यांनी म्हटलं.

28 Mar 2024, 08:57 वाजता

Loksabha Election 2024 Live : बारामती लोकसभा मतदारसंघातील नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस घेणार बैठक
 
बारामती लोकसभा मतदारसंघातील नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बैठक घेणार आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक देखील होणार आहे. यापूर्वीदेखील देवेंद्र फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांसोबत दोनवेळा बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे बारामतीतील महायुतीतला वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत.

28 Mar 2024, 08:41 वाजता

Loksabha Election 2024 Live : नारायण राणेंना रत्नागिरी सिंधूदुर्गातून उमेदवारी निश्चित - सूत्र

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी सिंधूदुर्ग मतदारसंघ भाजपकडे आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधूदूर्ग मतदारसंघातून नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

28 Mar 2024, 08:36 वाजता

Loksabha Election 2024 Live : महाविकास आघाडीमध्ये चुरस; मुंबईत महत्त्वाची बैठक

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज दुपारी 4 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी 17 मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत. त्यानंतर आज ही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

28 Mar 2024, 08:32 वाजता

Loksabha Election 2024 Live : भाजपात जायची वेळ आली तर तटकरे पहिली उडी मारतील - रोहित पवार

सुनील तटकरे आज अजित पवार यांच्यासोबत आहेत पण भाजप मध्ये जायची वेळ आली तर सर्वात प्रथम सुनील तटकरे पहिली उडी मारतील असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. मुरुड येथील शेकापच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी हे भाकीत केलंय. सुनील तटकरे यांनी अंतुले साहेबाना सोडले विलासराव देशमुखांना सोडले शरद पवारांना सोडले जयंत पाटलानाही सोडले. स्वहितासाठी ते इकडून तिकडे उड्या मारणार असतील तर विचार करण्याची वेळ आली आहे, असंही रोहित पवार म्हणाले.

28 Mar 2024, 08:28 वाजता

Loksabha Election 2024 Live : शिंदे गटाची यादी आज जाहीर होण्याची शक्यता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी राज्यस्तरीय बैठक पार पडली. ही बैठक जवळपास दोन तास चालली आणि या बैठकीत जागा वाटपा संदर्भात शिक्कामोर्तब करण्यात आलं. या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या आठ जागा आज जाहीर होऊ शकतात. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील कुठल्या खासदाराला उमेदवारी भेटेल आणि कुठल्या खासदाराचे तिकीट कापले जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.