Loksabha Election 2024 Live Updates:उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी म्हणजेच 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्यापैकी प्रामुख्याने उल्लेख करायचा झाल्यास आज सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे पुण्यात शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील अनेक उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याच घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह ब्लॉगमधून घेऊयात...

Loksabha Election 2024 Live Updates:उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी

Loksabha Election 2024 Live Updates: राज्यात आज अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. प्रचारसभा, रॅली, रोड शोंबरोबरच अनेक उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुण्यामध्ये आज शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. या आणि अशा अनेक घडामोडींवर आपण लाईव्ह ब्लॉगमधून नजर टाकणार आहोत... चला तर पाहूयात काय काय घडतंय आज राज्यातील राजकारणामध्ये

25 Apr 2024, 12:29 वाजता

राहुल गांधी अमेठीतुन निवडणूक लढणार? 1 मेला अर्ज भरणार?

25 Apr 2024, 11:50 वाजता

नाशिकसाठी राष्ट्रवादीची तातडीची बैठक; भुजबळ मात्र येवल्यात

नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राष्ट्रवादीचा असावा म्हणून जिल्हा राष्ट्रवादीने तातडीची बैठक बोलावली आहे. पक्षप्रमुखांनी याबाबत तातडीने निर्णय घ्यावा यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी विचार करत आहेत. नाशिक शहरातील मुंबई महामार्गालगत असलेल्या राष्ट्रवादी भवनमध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला शहर आणि ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित आहेत. एका बाजूला बैठक सुरू असताना छगन भुजबळ मात्र येवला मतदारसंघात रवाना झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच समता परिषदेच्या बैठकीमध्ये भुजबळांनी घेतलेली माघार मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आलेली.

25 Apr 2024, 10:25 वाजता

अजित पवार-राहुल कुल एकाच मंचावर

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारानिमित्त दौंड तालुक्यात आज अजित पवार आणि राहुल कुल एकाच मंचावर येणार आहेत. अनेक वर्षांपासून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष असलेल्या तालुक्यात दोन नेते पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. यावेळी अजित पवार हे भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

25 Apr 2024, 10:18 वाजता

शरद पवार गटाच्या शपथपत्रामध्ये काय?

युवा, महिला, युवती, शेतकरी, कामगार, उपेक्षित घटक, अल्पसंख्याक अश्या अनेक घटकांचा पवार गटाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला असल्याचं वंदना चव्हाण यांनी सांगितलं आहे. नागरी विकास, उद्योग, पर्यावरण, पर्यटन, परराष्ट्रीय धोरण याचबरोबर अनेक नावीन्यपूर्ण विषय या शपथपत्रमध्ये आहेत, असं वंदना चव्हाण यांनी सांगितलं.

 

25 Apr 2024, 10:15 वाजता

अनेकांकडून माहिती घेऊन तयार केला जाहीरनामा

जाहीरनामा बनवणाऱ्या वंदना चव्हाण यांनी शरद पवार गटाच्या जाहीरनाम्याबद्दल बोलताना, "जाहीरनामा तयार करण्यासाठी मला शरद पवार आणि जयंत पाटील यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. अनेक लोकांकडून माहिती घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे. आम्हाला अनेक सूचना या आल्या होत्या. त्याचा आम्ही जाहीरनामा तयार करताना विचार केला आहे. पुढच्या काळात काही इनपुट आल्यास त्यासंदर्भातही आग्रही असू," असं म्हणाल्या.

25 Apr 2024, 10:11 वाजता

आम्ही या जाहीरनाम्यासाठी आग्रही असणार: पवार

आम्ही मर्यादित जागा लढवत आहोत. आम्ही यंदा दहाच जागा लढवत असून आम्ही जो जाहीरनामा केला आहे त्यासाठी आम्ही संसदेत आग्रही असणार आहे, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

25 Apr 2024, 10:10 वाजता

शरद पवार गटाचा जाहीरनाम्याची घोषणा

हा आमचा जाहीरनामा नसून शपथपत्र आहे असं शरद पवार गटाचा जाहीरनाम्याची घोषणा करताना जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. हा जाहीरनामा वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला आहे.

25 Apr 2024, 09:35 वाजता

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जोरदार शक्तीप्रदर्शन

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी संभाजीनगरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. अर्ज भरण्यासाठी काढण्यात येणा-या रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.  

25 Apr 2024, 08:47 वाजता

शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

25 Apr 2024, 08:45 वाजता

'..किमान माझ्या अंत्यसंस्काराला तरी या'; जाहीर भाषणात काँग्रेस अध्यक्षांचं भावनिक आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झालं असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. याच प्रचारादरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षांनी एक भावनिक विधान केलं आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त..