Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

5 May 2024, 21:50 वाजता

शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ

 

Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ आहे. सततच्या सभा, दौरे, दगदगीमुळे त्यांना थकवा जाणवतोय. त्यामुळे शरद पवार यांचे उद्याचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रचाराच्या ताणामुळे त्यांची प्रकृती बिघडली असून, खबरदारीसाठी त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. दरम्यान बारामतीच्या सांगता सभेतही त्यांना बोलताना त्रास जाणवला होता. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

5 May 2024, 20:59 वाजता

नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का?, नाराज विजय करंजकर शिंदे गटात प्रवेश करणार?

 

Vijay Karanjkar : लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.. ठाकरे गटाचे नाराज असलेले विजय कंरजकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज रात्रीच विजय कंरजकर पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे.. विजय करंजकर यांना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.. नाशिकचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांना आणखी एक मोठं यश मिळाल्याचं दिसतंय.. विजय करंजकर यांच्या प्रवेशाने मविआचे म्हणजेच ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

5 May 2024, 19:07 वाजता

नागपुरात विजय वडेट्टीवारांविरोधात भाजप आक्रमक

 

Nagpur BJP : शहीद हेमंत करकरेंबाबतच्या वक्तव्यानंतर विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भाजप कार्तकर्ते आक्रमक झालेत...नागपूरमधील वडेट्टीवारांच्या घराबाहेर भाजप युवामोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं...त्याचबरोबर वडेट्टीवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध व्यक्त केला...यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचं पहायला मिळालं....

5 May 2024, 18:12 वाजता

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार थांबला

 

Maharashtra Politice : लोकसभा निवडणुकीतील तिस-या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत... 12 राज्यांतील 94 जागांसाठी मंगळवारी 7 मे रोजी मतदान होणार आहे... तर राज्यात 11 लोकसभा मतदारसंघांत 7 मे रोजी मतदान होतंय. यात पश्चिम महाराष्ट्रासह, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गचा समावेश आहे. त्यासाठी या भागात शेवटच्या क्षणापर्यंत सुरु असलेल्या मातब्बर नेत्यांच्या प्रचार तोफा थंडावल्या आहेत... 

5 May 2024, 17:21 वाजता

 इचलकरंजीमध्ये स्वाभिमानी-महायुतीत तुफान राडा

 

Ichalkaranji Politics : आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. राजू शेट्टी यांची पदयात्रा शिवतीर्थ परिसरात आली... याच दरम्यान शिवतीर्थावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे बाईक रॅली सुरुवात होणार होती.. त्याचवेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. या प्रकारामुळे शिवतीर्थ परिसरातील तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गस्थ केलं.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट देखील झाली.

5 May 2024, 16:01 वाजता

नाशिकच्या दिंडोरीमधून जे. पी. गावितांची माघार

 

J. P. Gavit : नाशिकच्या दिंडोरी लोकसभेतून जे. पी. गावितांनी माघार घेतलीये...त्यामुळे मविआला मोठा दिलासा मिळालाय...गावितांच्या उमेदवारीने महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना फायदा होणार होता..त्यामुळे शरद पवारांनी स्वत: मध्यस्थी करत गावितांना माघार घेण्यास सांगितलं होतं...गावितांनी माकपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता...जयंत पाटलांनीही काही दिवसांपूर्वी गावितांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता...भास्कर भगरेंना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गावित नाराज होते...मात्र, आज मकाप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा मेळावा घेतल्यावर गावितांनी माघार घेत असल्याचं स्पष्ट केलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

5 May 2024, 15:22 वाजता

जे. पी. गावित उमेदवारी अर्ज मागे घेणार?

 

 

J. P. Gavit : नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात माकप पदाधिका-यांची बैठक सुरूये...या बैठकीनंतर जे. पी. गावित निवडणूक लढवणार की नाही याबाबत निर्णय जाहीर करणार आहेत...जे. पी. गावित यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलाय...गावितांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय...गावितांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून मविआकडून त्यांची मनधरणी सुरूये...काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी देखील गावितांची भेट घेऊन चर्चा केली होती...गावितांच्या भुमिकेमुळे महायुतीच्या उमेदवार भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांचंही टेन्शन वाढलंय...मेळाव्यनंतर गावित काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...

5 May 2024, 14:34 वाजता

नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली

 

Nashik Mahayuti : नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढलीये...भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातूनही बंडखोरी झालीये...राष्ट्रवादीचे निवृत्ती अरिंगळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय...यापूर्वी भजापचे अनिल जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय....शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसेंनी नाशिकमधून महायुतीचं तिकीट मिळाल्यामुळे महायुतीतील घटकपक्षांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

5 May 2024, 13:53 वाजता

विजय वडेट्टीवारांचा भाजपसह अशोक चव्हाणांवर निशाणा

 

Vijay Wadettiwar On Ashok Chavan : कोल्हापुरात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपनं अनेकांची घरं फोडली... तर आमची नांदेडची खिडकीही काढून नेली, असा चिमटा त्यांनी भाजपसह अशोक चव्हाणांचा काढला. पण, खिडकी नेली म्हणून कुणी घरात राहणं बंद करत नाही. नव्या खिडकीची ऑर्डर दिलीय, असं वडेट्टीवार म्हणाले.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

5 May 2024, 13:21 वाजता

खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीत वाढ

 

Washim Fertilizer : ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किंमतीती मोठी वाढ झालीये.. त्यामुळे शेतक-यांवर त्याचा आर्थिक भार पडू लागलाय.. वाशिम जिल्ह्यात खरिपाची पेरणी सुरु  होणार आहे. मात्र त्यापूर्वी खतांचा बेसल डोस द्यावा लागतो.. त्यामुळे रासायनिक खतांची मागणी वाढलीये.. मिश्र खतं, सुपर पोटॅशच्या दरातही मोठी वाढ झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत..