Sam Pitroda Resigned : सॅम पित्रोदांनी दिला राजीनामा

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Sam Pitroda Resigned : सॅम पित्रोदांनी दिला राजीनामा

8 May 2024, 22:34 वाजता

सॅम पित्रोदांनी ओव्हरसीज काँग्रेस अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

 

Sam Pitroda Resigned : अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय... भारतीयांबाबत केलेलं वर्णद्वेषी वक्तव्य सॅम पित्रोदांना भोवलंय.. नॉर्थ-इस्टचे नागरिक चिनी दिसतात. तर दक्षिण भारतीय लोकं आफ्रिकन दिसतात, असं वादग्रस्त विधान सॅम पित्रोदा यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर काँग्रेसनंही आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर पित्रोदांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला... काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

 

8 May 2024, 20:24 वाजता

उत्तर प्रदेशची जबाबदारी मिळाल्याने प्रियंका गांधींचा नंदुरबार दौरा रद्द- नाना पटोले

 

Priyanka Gandhi Sabha : प्रियंका गांधी यांची नंदुरबारमध्ये होणारी सभा रद्द झालीय. नंदुरबार लोकसभेचे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचार सभेसाठी प्रियंका गांधी येणार होत्या. उत्तर प्रदेशची जबाबदारी मिळाल्यामुळे प्रियंका गांधी येऊ शकणार नाहीत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय. काँग्रेस पक्ष नेत्यांच्या सभेसाठी जय्यत तयारी केलेली होती. आता प्रियांका गांधी 11 तारखेला सकाळी येतील अशी चर्चा आहे. प्रियंका गांधींचा दौरा स्थगित झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झालाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

8 May 2024, 18:48 वाजता

मागण्या मान्य न केल्याने आदिवासी आणि कोळी बांधवांकडून रोष व्यक्त

 

Black flags shown to Fadanavis : धुळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्यात आलेत...आदिवासी आणि कोळी बांधवांनी मागण्या पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ आपला रोष व्यक्त केलाय...फडणवीस महायुतीच्या प्रचारासाठी धुळ्यात आहेत...त्यांचा ताफा जात असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

8 May 2024, 18:17 वाजता

सोनं प्रतितोळा 72 हजार 300 रुपये, चांदी प्रतिकिलो 82 हजार 700 रुपयांवर

 

Gold Price Hike : अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या चांदीला झळाळी मिळालीय... जळगाव या सुवर्ण नगरीत सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झालीय. सोन्याच्या दरात 350 रुपयांची वाढ होऊन सोनं 72 हजार 300 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचलंय. तर काही दिवसांपासून किरकोळ चढउतार होत असलेल्या चांदीच्या भावात प्रतिकिलो 1 हजार 100 रुपयांची वाढ झालीय. चांदीचा दर 82 हजार 700 प्रतिकिलो झालाय. त्यामुळे अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना फटका बसताना दिसतोय.

 

8 May 2024, 17:36 वाजता

मान्सून दुरुस्तीसाठी मुंबई विमानतळाच्या दोन्ही रनवेवरील उड्डाणसेवा बंद

 

Airlines Shut down : विमान प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी... मुंबई विमानतळ 9 मे रोजी बंद राहणार.. विमानतळाच्या दोन्ही रनवेवरील उड्डाणसेवा राहणार बंद.. मान्सूनच्या अगोदर दुरुस्तीसाठी विमानसेवा बंद.. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विमानसेवा राहणार बंद.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

8 May 2024, 14:17 वाजता

उद्धव ठाकरे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत - फडणवीस

 

Devendra Fadanvis : उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे ठेकेदार नाहीत...ते म्हणजे मराठी नाहीत ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत...मराठी माणसाला मुंबईतून निर्वासित करण्याचं काम ठाकरेंनीच केलंय...त्यामुळे  त्याबाबत ठाकरेंनी बोलू नये...असं प्रत्युत्तर फडणवीसांनी आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला दिलंय...

8 May 2024, 13:56 वाजता

प्रेयसीनं ब्रेकअप केल्यानं प्रियकरानं दुकान पेटवलं

 

Nagpur : प्रेयसीनं ब्रेकअप केलं म्हणून प्रियकरानं थेट दुकानालाच आग लावल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलीय...व्यापारीपेठ इतवारी इथं ही घटना समोर आलीय...प्रेयसीनं बोलणं बंद केलं, याचा राग मनात ठेवून प्रियकर प्रशांत चट्टेनं हा पराक्रम केलाय. पहाटेच्या सुमारास अंगावर शाल पांघरून हा महाशय दुकानाच्या शटरखाली पेट्रोल टाकून आग लावत असल्याचं सीसीटीव्हीत चित्रीत झालंय. आठवडाभराच्या तपासानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. चौकशीदरम्यान प्रेयसीनं बोलणं बंद केलं म्हणून ती काम करत असलेल्या दुकानाला आग लावल्याचं त्यानं कबुली दिली.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 May 2024, 12:50 वाजता

हायकोर्टाचा राज्य सरकारला दिलासा

 

Highcourt On State Government : संभाजीनगर, धारासिव नामांतराला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळलीय. शहरांची नावं बदलल्यानं याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, हायकोर्टानं ही याचिका फेटाळली. राज्य सरकारनं औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला आव्हान देत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका हायकोर्टानं फेटाळली. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला. तर नामांतराचाही मार्ग मोकळा झालाय. कोर्टाच्या या निर्णयाचं सत्ताधा-यांनी स्वागत केलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 May 2024, 12:17 वाजता

प्रादेशिक पक्ष विलीन होतील असं वाटत नाही - भुजबळ

 

Chagan Bhujbal On Sharad Pawar : प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मला वाटत नाही...शरद पवारांचा अनुभव मोठा आहे ते काय संकेत देत असतील मला महिती नाही...अशी प्रतिक्रिया भुजबळांनी पवारांच्या विधानावर दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

8 May 2024, 12:15 वाजता

शरद पवारांच्या म्हणण्यात तथ्य आहे - वडेट्टीवार

 

Vijay Wadettiwar On Sharad Pawar : शरद पवारांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय...पवार हे मोठे नेते असून, त्यांना दूरदृष्टी आहे...त्यामुळे 2024 सत्ता आल्यावर भरकटलेले, इकडे तिकडे गेलेले पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये येतील...अशी प्रतिक्रिया पवारांच्या विधानावर वडेट्टीवारांनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -