Onion Export : कांदा निर्यातमूल्यावरून भारत-पाकिस्तानात स्पर्धा

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Onion Export : कांदा निर्यातमूल्यावरून भारत-पाकिस्तानात स्पर्धा

9 May 2024, 22:42 वाजता

कांदा निर्यातीसाठी पाकिस्तानचं भारतापेक्षा कमी मूल्य

 

Onion Export : कांदा निर्यातमूल्यावरुन भारत-पाकिस्तानात स्पर्धा पाहायला मिळतेय. कांदा निर्यातीसाठी पाकिस्ताननं जाणीवपूर्वक भारतापेक्षा कमी मूल्य ठेवलं आहे. भारताचं मेट्रिक टनासाठी 550 डॉलर इतकं किमान कांदा निर्यातमूल्य आहे. त्याचवेळी पाकिस्ताननं 700 डॉलरवरुन 325 डॉलर इतकं निर्यातमूल्य केलं आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

9 May 2024, 21:18 वाजता

शेअर बाजारात दिवसअखेर मोठा भूकंप, गुंतवणूकदारांचे 7.29 लाख कोटी रुपये बुडाले

 

Share Market Collapsed : मुंबई शेअर बाजारात मोठा भूकंप पाहायला मिळाला. शेअर बाजारात प्रचंड प्रमाणात विक्री झाली आणि ती 3 आठवड्यांतील निचांकी पातळीवर बंद झाली. यात गुंतवणूकदारांचे तब्बल 7.29 लाख कोटी रुपये बुडाले. दिवसअखेर सेन्सेक्स 1062 अंक कोसळून 72,404वर बंद झाला. तर निफ्टी 345 अंकांनी घसरुन 21,957वर स्थिरावला. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

9 May 2024, 19:55 वाजता

भाजपनं गृहमंत्री फडणवीसांना विचारावं- अमोल कीर्तिकर

 

Amol Kirtikar on BJP : महाविकास आघाडीचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये, बॉम्बस्फोटाचा आरोपी सहभागी झाल्याचा आरोप, भाजपकडून करण्यात आलाय. 1993च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान यानं अमोल कीर्तिकर यांचा प्रचार केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे पक्षावर टीकेची झोड उठवली. तर ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी भाजपवरच पलटवार केलाय. त्याचवेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपलाच आरोपीच्या पिंज-यात उभं केलं. मध्यप्रदेशातील भाजपचा पदाधिकारी टेररिस्ट फंड गोळा करत होता याची आठवण पटोलेंनी यावेळी करुन दिली.

 

9 May 2024, 18:15 वाजता

अरविंद केजरीवालांच्या अंतरिम जामीन अर्जावर उद्या सुनावणी

 

Will Arvind Kejriwal get bail? : सुप्रीम कोर्ट उद्या केजरीवालांच्या अंतरिम जामीन अर्जावर निर्णय देणार आहे. मात्र त्यापूर्वीच EDकडून आज सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं. केजरीवालांना जामीन दिला जाऊ नये यासाठी EDनं मुद्दे मांडले आहेत. यामध्ये निवडणूक प्रचार हा मुलभूत अधिकार नाही त्यामुळे अंतरिम जामिनासाठी तो आधार असू शकत नाही. निवडणुकीच्या नावाखाली जामिनावर सोडवण्याचा प्रयत्न झाला तर यामुळे चुकीची परंपरा निर्माण होईल. तसंच या आधारावर निवडणूक लढवणाऱ्या कोणत्याही व्यक्तिला, आतापर्यंत अंतरिम जामीन मिळालेला नसल्याचं EDनं म्हंटलंय. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी केजरीवाल सध्या अटकेत आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

9 May 2024, 17:16 वाजता

शरद पवारांच्या वक्तव्याचा रोख उद्धव ठाकरेंकडे असेल- आंबेडकर

 

Ambedkar on Sharad Pawar : शरद पवारांचं काँग्रेसमध्ये छोटे पक्ष विलीन होतील हे विधान उद्धव ठाकरेंच्या सेनेसंदर्भात असू शकतं असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत...पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे अडचणीत असले की मदत करणारा मी पहिला असेन असं म्हटलं होतं...त्याचा विचार करता शरद पवारांनी हे विधान केलं असावं असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

9 May 2024, 14:26 वाजता

'3 टप्प्यातील मतदान मोदींना अस्वस्थ करणारं',शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका

 

Sharad Pawar on PM Modi : पहिल्या तीन टप्प्यातलं मतदान मोदींना अस्वस्थ करणारं आहे, त्यामुळेच मोदींनी मुस्लिम समाजाचा थेट उल्लेख करायला सुरुवात केली.. असं शरद पवारांनी म्हटलंय. तर मविआच्या 30 ते 35 जागा येतील असा विश्वासही पवारांनी व्यक्त केलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

9 May 2024, 13:46 वाजता

भारतात हिंदूंची लोकसंख्या घटली, मुस्लिमांची वाढली

 

India Hindu And Muslim : 1950 ते 2015 दरम्यान देशात हिंदुंची लोकसंख्या सुमारे 8 टक्क्यांनी घटलीय. याच कालावधीत देशात मुस्लिम लोकसंख्या 43 टक्क्यांनी वाढलीय.. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या रिपोर्टमधून हा दावा करण्यात आलाय

बातमीचा व्हिडीओ पाहा-

9 May 2024, 13:30 वाजता

नाशिकमध्ये पाणीटंचाईचं भीषण संकट

 

Nashik Water : नाशिक जिल्ह्यात मोठं पाणीसंकट निर्माण झालंय. अर्ध्या महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणानं तळ गाठलाय. तर 23 पैकी 18 धरणांमध्ये जवळपास पाणीसाठा नसल्यागत जमा आहे. दुसरीकडे जलसंपदा विभागानं गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्राद्वारे एकलहरे औष्णिक विद्यूत केंद्राला पाणी सोडलं. त्यामुळे नाशिकमध्ये आणखीनच पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झालीये. त्यामुळे आता नाशिककरांची तहान कशी भागणार? हा मोठा प्रश्न पडलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

9 May 2024, 12:38 वाजता

जालन्यात शेकडो मतदान कार्ड रस्त्यावर

 

Jalna Voter Card :  जालन्यात रस्त्यावर मतदान कार्डांचा खच पडलाय.. अज्ञात व्यक्तीनं शेकडो मतदान कार्ड रस्त्यावर फेकून दिलेत.. नूतन वसाहत भागात ही घटना घडलीये.. फेकलेले मतदान कार्ड निवडणूक अधिका-यांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. विशेष म्हणजे जालना लोकसभा निवडणूकीला अवघे 4 दिवस शिल्लक असताना रस्त्यावर अशा प्रकारे मतदान कार्ड फेकून दिल्यानं चिंता व्यक्त करण्यात येतीये..  

बातमीचा व्हिडीओ पाहा-

9 May 2024, 12:12 वाजता

'मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेला भाडोत्री गर्दी', चंद्रकांत खैरेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

 

Uday Samant Vs Chandrakant Khaire : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाजीनगरमधील सभेला भाडोत्री गर्दी होती. लोकांना पैसे देऊन आणलं होतं असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या बजाजनगर इथं जाहीर सभा झाली होती. त्यावरून खैरेंनी त्यांच्यावर निशाणा साधला. तर खैरेंना पराभव समोर दिसत असल्यामुळे ते असे वक्तव्य करत असल्याचा पलटवार शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी केलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-