Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

10 May 2024, 22:28 वाजता

'आधी पक्ष फोडले, आता मोदी डोळा मारतात',उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका

 

Uddhav Thackeray on PM modi : आधी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडले.. आता आम्हालाच मोदी डोळा मारतात.. आ जा मेरे गाडी में बैठ जा म्हणतात, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदींची खिल्ली उडवली. मोदी आता परत दिल्ली बघत नाहीत आणि महाराष्ट्र त्यांना दिल्ली बघू देणार नाही, असंही ठाकरेंनी संभाजीनगरातल्या जाहीर सभेत बोलताना ठणकावलं.

 

10 May 2024, 20:36 वाजता

छत्तीगडमध्ये 12 नक्षलवाद्यांचा खात्मा

 

Chhattisgarh Naxal : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत छत्तीगडमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. बिजापूरच्या पिडिया जंगलात पोलिसांनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. नक्षलवाद्यांना निवडणुकीत मोठा घातपात घडवून आणायच होता का ? या संदर्भात पोलिसांनी चौकशी सुरू केलीय

बातमीचा व्हिडीओ पाहा-

10 May 2024, 20:10 वाजता

बारामतीत निवडणूक आयोगाची कारवाई

 

Cash Distribution In Baramati : बारामतीत मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप केल्याच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतलीय.. निवडणूक आयोगाने बारामतीत पैसे वाटल्याच्या आरोपाप्रकरणी 4 ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत.. आचारसंहिता भंग केल्याचा ठपकाही निवडणूक आयोगाने ठेवलाय.. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी इंदापूर आणि बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप केला होता. त्यांनी एका पाठोपाठ तीन व्हिडिओ व्हायरल केले होते. आता बारामतीची निवडणूक संपताच निवडणूक आयोगाने कारवाईचा धडाका सुरू केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

10 May 2024, 19:37 वाजता

प्रदीप शर्मांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा

 

Pradeep Sharma : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना मोठा सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालाय. कोर्टानं लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना अंतरिम जामीन मंजूर केलाय. मुंबई हायकोर्टानं शर्मांना जामीन नाकारला होता. याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

10 May 2024, 19:16 वाजता

'लंके बेटा, तू किस झाड की पत्ती है?...'अजित पवारांचा निलेश लंकेंना टोला

 

Ajit Pawar On Nilesh Lanke : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दक्षिण नगरचे मविआचे उमेदवार आमदार निलेश लंकेंना चांगलाच दम भरला.. लंके बेटा, तू किस झाड की पत्ती है? ज्या शाळेत शिकतोस त्याचा मी हेडमास्तर आहे, असा टोला त्यांनी लगावला. माझ्या नादी लागू नको, पुरता बंदोबस्त करेन, असा इशाराही अजितदादांनी पारनेरमध्ये आयोजित सभेत बोलताना दिला.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

10 May 2024, 18:28 वाजता

रवींद्र वायकरांना ठाकरे गटाची कारणे दाखवा नोटीस

 

Ravindra Waikar : शिंदे गटात जाताच रवींद्र वायकरांना लोकसभा उमेदवारी देण्यात आल्याने ठाकरे गट आक्रमक झालाय...ईडीच्या भीतीने वायकर शिंदे गटात गेल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतोय...तर ठाकरे गटात आमदार असताना शिंदे गटात जाताच उमेदवारी मिळाल्याने वायकरांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलीये...आमदार अपात्रतेची कारवाई आपल्यावर का करण्यात येऊ नये असा प्रश्न या नोटीसमध्ये विचारण्यात आलाय...

 

10 May 2024, 18:14 वाजता

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांवर गुन्हा दाखल 

 

Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारीनंतर नागपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी भाजप नेते उज्ज्वल निकमांवर टीका करताना मुंबईचे माजी पोलीस महानिरीक्षक एस एम मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला दिला होता. 26/11 च्या हल्ल्यावेळी एका पोलीस अधिका-यानं हेमंत करकरेंचा बळी घेतला, हेमंत करकरेंच्या शरिरात घुसलेली गोळी अतिरेक्यांची नव्हती असा उल्लेख पुस्तकात आहे. या पुस्तकाचा दाखला देत वडेट्टीवारांनी निकमांवर आरोप केले होते. मात्र हेच आरोप वडेट्टीवारांना भोवण्याची शक्यता आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

10 May 2024, 17:33 वाजता

तेलंगणात नवनीत राणांवर गुन्हा दाखल

 

Navneet Rana : राहुल गांधी यांच्याबाद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या नवनीत राणांना निवडणूक आयोगानं दणका दिलाय. नवनीत राणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...तेलंगणाच्या शादनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक अचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. राहुल गांधींना मतदान केलं तर ते थेट पाकिस्तानात जातं, असं विधान नवनीत राणा यांनी केलं होतं.

10 May 2024, 17:02 वाजता

अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र

 

Amol Kolhe : मतदानाच्या आदल्या दिवशी शिरुर मतदारसंघात पैसे वाटप होण्याची शक्यता आहे, असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलाय. त्यांनी थेट शिरूरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. मतदार संघातील पीडिसीसी बँक आणि प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ पतसंस्थेच्या सर्व शाखांबाहेर पोलीस बंदोबस्त देण्याची केली मागणीही त्यांनी केलीय. 

10 May 2024, 16:46 वाजता

अवकाळी पावसामुळे शरद पवारांची वडगावशेरीतील सभा रद्द, उद्धव ठाकरेंचा जालना दौरा रद्द

 

Rain : राज्यात दिग्गज नेत्यांच्या सभांवर पावसाचं सावट पहायला मिळतंय...पुणे, छत्रपतीसंभाजी नगर, जालना आणि राज्यात इतर ठिकाणी अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय...त्यातच पुण्याच्या वडगावशेरीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी होणारी शरद पवारांची सभा पावसामुळे रद्द करण्यात आलीये...आदित्य ठाकरेही या सभेला उपस्थित राहणार होते...त्याचबरोबर पुण्यातच राज ठाकरेंच्या महायुतीच्या उमेदवारासाठी होणा-या सभेवर पावसाचं सावट आहे...तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे जालन्याला जाणार होते...मात्र पावसामुळे ठाकरेंचा जालना दौरा रद्द करण्यात आलाय...