Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

20 Apr 2024, 22:13 वाजता

फडणवीस लाज लज्जा सोडलेला माणूस - उद्धव ठाकरे

 

Uddhav Thackeray On Devendra Fadanvis : आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करु या उद्धव ठाकरेंच्या विधानावरुन आता ठाकरे-फडणवीसांमध्ये जुंपलीय. उद्धव ठाकरेंना वेड लागलं असेल, मला नाही असा पलटवार देवेंद्र फडणवीसांनी केलाय.. तर फडणवीसांनी किमान जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Apr 2024, 21:08 वाजता

भाजप ओबीसीविरोधी पक्ष - नाना पटोले

 

Nana Patole On BJP : ओबीसी कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही भाजपवर निशाणा साधलाय. भाजप हा OBCविरोधी पक्ष असल्याची टीका नाना पटोलेंनी केली. भाजपनं OBC आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच OBC मुलांची स्कॉलरशिप थांबवण्यात आल्याची टीका त्यांनी केली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Apr 2024, 18:55 वाजता

लोकसभेपूर्वी विरोधकांनी मैदान सोडलं - धैर्यशील मोहिते-पाटील

 

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या मैदानात खेळण्यापूर्वीच विरोधकांनी मैदान सोडल्यासारखं वाटतंय....शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना टोला लगावलाय....निंबाळकरांनी मोहितेंच्या अर्जावर हरकत घेतली होती...तर, निवडणूक निर्णय अधिका-यांनी धैर्यशील मोहितेंचा अर्ज वैध ठरवलाय....त्याबाबत बोलताना मोहितेंनी ही प्रतिक्रीया दिलीये....दुस-याच्या नावाने अर्ज देऊन रडीचा डाव खेळलं नाही पाहिजे असंही ते म्हणालेत...त्याचबरोबर एकमेकांच्या अर्जावर हरकती घ्यायच्या नाही असं ठरलं होतं असा दावाही मोहितेंनी केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Apr 2024, 18:15 वाजता

संभाजीनगरमधून संदिपान भुमरे महायुतीचे उमेदवार

 

Loksabha Election 2024 : महायुतीचा अखेर छत्रपती संभाजीनगरमधला उमेदवार ठरलाय... मंत्री संदीपान भुमरेंना छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी देण्यात आलीय.. त्यामुळे महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांच्यासोबत भुमरेंचा सामना होणार आहे.. तसंच MIMकडून इम्तियाज जलील मैदानात आहेत. त्यामुळे संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Apr 2024, 18:04 वाजता

उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेऊ नका - रामदास कदम

 

Ramdas Kadam On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवू नका... ते लबाड आहेत, असा घणाघात रामदास कदम यांनी केला. रायगडच्या मंडणगडच्या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंची नस न नस आपल्याला माहीत असल्याचं ते म्हणाले.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Apr 2024, 17:53 वाजता

उद्धव ठाकरेंना वेड लागलं, भ्रमिष्ट झालेत - देवेंद्र फडणवीस

 

Devendra Fadanvis On Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केलाय.. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करु असा शब्द फडणवीसांना दिल्याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला होता. त्यावरच फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंना वेड लागलं असेल, मला वेड लागलेलं नाही असा पलटवार देवेंद्र फडणवीसांनी केलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Apr 2024, 16:59 वाजता

भिवंडीचे सपा आमदार रईस शेख यांचा राजीनामा

 

Bhiwandi SP MLA Resign : भिवंडीतील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय....त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सुपुर्द केलाय...पक्षांतर्गत कुरघोडींना कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचं समजतंय..तर त्यांचा राजीनामा स्वीकारल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिलाय...रईस शेख यांनी राजीनामा दिल्याचं समजताच त्यांचे समर्थक आक्रमक झाले आणि रस्त्यावर आल्याचं पहायला मिळालं....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Apr 2024, 15:44 वाजता

समता परिषदेचा महायुतीच्या नेत्यांवर आरोप

 

Loksabha Election 2024 : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केलीय. महायुतीतील काही नेत्यांनी छगन भुजबळांना नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडल्याचा आरोप भुजबळांच्या समर्थकांनी केलाय. भुजबळांनी माघार घेतल्यानं OBC नेत्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाल्याची प्रतिक्रिया भुजबळांचे समर्थक देतायेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Apr 2024, 15:42 वाजता

वंचितच्या उमेदवारावरील आरोप फेटाळले

 

Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये वंचितच्या उमेदवारावर करण्यात आलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिका-यांनी फेटाळलाय....भाऊसाहेब आंधळकरांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला होता...खासदार ओमराजे निंबाळकरांनी हा आरोप केला होता...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Apr 2024, 14:17 वाजता

'इंडी आघाडीकडे चेहराच नाही',पंतप्रधान मोदींची इंडी आघाडीवर टीका

 

PM Modi : नांदेडमधल्या सभेतून पंतप्रधान मोदींनी इंडी आघाडीवर सडकून टीका केलीय.. इंडी आघाडीला लोकांनी नाकारलंय, आपआपसातच भांडणं सुरु आहेत.. इंडी आघाडीकडे चेहराच नाही.. असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केलाय..