Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

23 Apr 2024, 21:56 वाजता

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर निशाणा

 

Akola Amit Shah : संविधान बदलण्याची ताकद जनता 10 वर्षांपासून देत आहे... 2014 आणि 2019 ला संपूर्ण बहुमत मिळालं. मात्र, सरकारनं आरक्षण नाही तर कलम 370 हटवलं, असा निशाणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर साधलाय. अकोल्यात महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारसभेत त्यांनी विरोधाकांवर टीकास्त्र सोडलं. जोपर्यंत भाजप आहे... तोपर्यंत आरक्षण कुणीही हटवणार नसल्याचं शाह म्हणाले.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Apr 2024, 20:22 वाजता

दक्षिण मुंबई लोकसभेसाठी यामिनी जाधवांचं नाव-सूत्र

 

Yamini Jadhav : मुंबईतून मोठी बातमी समोर येतेय. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून यामिनी जाधवांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. यामिनी जाधव या भायखळा विधानसभेच्या शिवसेनेच्या विद्यमान आमदार आहेत.. शिवसेनेतल्या बंडावेळी त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतही होत्या... यामिनी जाधव यांनी काल ठाण्यात मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती.  त्यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठकही पार पडली होती. यात शिवसेना पदाधिका-यांनी यामिनी जाधवांच्या नावाला पसंती दिली होती.. यामिनी जाधव मुंबई महापालिकेत नगरसेवक होत्या.. बाजार उद्यान समितीच्या अध्यक्षा तसंच विधिमंडळ शक्ती विधेयक समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Apr 2024, 17:02 वाजता

अमरावतीत राणा आणि कडू वाद शिगेला

 

Amravati Bacchu Kadu : अमरावीतमधील कडू विरुद्ध राणा वाद शिगेला पोहोचलाय...बच्चू कडूंनी सभेसाठी सायन्सकोर मैदान बूक केलं होतं....त्याची परवानगीही त्यांना मिळाली होती...मात्र, त्याच दिवशी म्हणजे उद्या गृहमंत्री अमित शाहांची सभा याच मैदानावर होत आहे...नवनीत राणांसाठी ही सभा होतेय...त्यासाठी स्टेजचं कामही सुरू आहे...ही माहिती मिळताच स्वत: बच्चू कडू सायन्सकोर मैदानावर दाखल झाले...यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं...संतप्त बच्चू कडूंनी शाहांच्या सभेच्या परवानगीचा कागद पोलिसांकडे मागितला आणि प्रश्न विचारले...यावेळी पोलिसांना कडूंच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देता आली नाही...तर संतप्त झालेल्या बच्चू कडूंनी त्यांना मिळालेल्या मैदानाच्या परवानगीचा कागद फाडून टाकला...आणि उद्या याच मैदानावर उपोषण करणार असल्याचा इशाराही कडूंनी दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Apr 2024, 16:59 वाजता

बुलढाण्याला अवकाळी पावसाचा तडाखा

 

Buldhana Heavy Rain : बुलढाण्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. शेगांवमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झालीय. गहू, हरभर, तूर पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावलाय. बोरांच्या आकाराएवढा गारा पडल्या. गारपिटीच्या तडाख्याने शेतकरी मात्र चिंतेत झालाय. वादळी वारा आणि पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झालाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Apr 2024, 16:52 वाजता

छगन भुजबळांनी निवडणूक लढवावी, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांची मागणी

 

Nashik Chagan Bhujbal : नाशिकमधून भुजबळांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलीय. मात्र निवडणूक लढवणार नाही मात्र जागेवर दावा कायम असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. नाशिकमध्ये आज समता परिषदेची बैठक झाली. त्यानंतर भुजबळ बोलत होते. महायुतीनं लवकरात लवकर उमेदवारी जाहीर करावी अन्यथाजागेवर परिणाम होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Apr 2024, 15:48 वाजता

शासनाच्या क्रीडा विभागात 47 लाखांची चोरी

 

Sports Department : शासनाच्या क्रीडा विभागत तब्बल 47 लाख 60 हजार रुपयांची चोरी झाल्याचं उघड झालंय...आरोपींनी क्रीडा विभागाचा बनावट स्टँप, बनावट चेक आणि स्वाक्षरी करून पैसे लंपास केल्याचं समोर आलंय...याबाबत मरीनड्राईव्ह पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आलीये....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

23 Apr 2024, 13:55 वाजता

सलमानच्या घरावर गोळीबारासाठी वापरलेली शस्त्र जप्त

 

Salman Khan's Firing Case : सलमानच्या घरावर गोळीबारासाठी वापरली शस्त्र सापडली...तापी नदीतून दोन बंदुका हस्तगत...पोलिसांकडून आरोपींच्या फोनचा तपास सुरु...गुन्हे शाखा दोघांवरही मकोका लावण्याच्या तयारीत

बातमीचा व्हिडीओ पाहा-

23 Apr 2024, 13:32 वाजता

'रोहित, युगेंद्रना अतिरिक्त सुरक्षा द्या', सुप्रिया सुळेंची पोलिसांकडे मागणी

 

Supriya Sule : रोहित पवार आणि युगेंद्र पवारांना अतिरिक्त सुरक्षा द्या.. अशी मागणी सुप्रिया सुळेंनी पोलिसांकडे पत्र लिहित केलीय.. दोघांना दडपशाहीचा सामना करावा लागतोय, काही लोकं घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतायत.. त्यामुळे रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केलीय.. 

23 Apr 2024, 12:56 वाजता

'पार्थ पवारला मोदींसारखी सुरक्षा द्या', रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

 

Rohit Pawar on Ajit Pawar : श्रीरंग बारणेंच्या प्रचारात अजित पवार सहभागी झाल्यावरून रोहित पवारांनी टीका केलीय...मावळ लोकसभेत मुलाचा पराभव केला त्यांचाच प्रचार अजित पवार करतायत...अजितदादांना स्वतःचं बरंच काही पचवायचं असल्यानं ते बारणेंचा प्रचार करतायेत अशी टीका रोहित पवारांनी केलीय...मात्र पार्थचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळमध्ये आल्याचं त्यांनी म्हटलंय...तर पार्थ पवारला मोदींची सुरक्षा द्यावी असा उपरोधिक टोलाही रोहित पवारांनी लगावलाय...
 

23 Apr 2024, 12:16 वाजता

मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर शरद पवार पक्षात करणार प्रवेश 

 

Sanjay Kshirsagar : सोलापुरातील मोहोळचे भाजप नेते संजय क्षीरसागर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. उद्या ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. गेल्या 10 वर्षांत अपमानास्पद वागणूक दिली गेली. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं त्यांनी सांगितलंय.