Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

24 Apr 2024, 18:14 वाजता

विनोद पाटील यांची निवडणुकीतून माघार

 

Sambhajinagar Vinod Patil : विनोद पाटलांनी अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलीय. संभाजीनगरमधून ते शिवसेनेकडून इच्छुक होते. त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे ते नाराज होते. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयार सुरू केली होती. मात्र मंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद पाटलांची नाराजी दूर केलीय. अखेर सामंत, शिंदेंची शिष्टाई यशस्वी झाल्याची चर्चा सुरू आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Apr 2024, 17:54 वाजता

मराठा समाजाची भीती वाटली पाहिजे असं पाडा - मनोज जरांगे पाटील

 

Manoj Jarange Patil : समाजाच्या मताची भीती वाटली पाहिजे असं पाडा, ज्याला पाडायचं त्याला पाडा...असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलंय...ज्याला पाडाल त्याच्या पाच पिढ्यांना भीती वाटली पाहिजे असंही जरांगे म्हणालेत...लोकसभा निवडणुकीत कोणालाही पाठिंबा नसून कोणालाही विरोध नसल्याचंही जरांगे यावेळी म्हणालेत...धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येडेश्वरी देवीच्या यात्रेसाठी मनोज जरांगे पाटील आले असता ते बोलत होते...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Apr 2024, 15:54 वाजता

उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

 

Uddhav Thackeray On Prime Minister Narendra Modi : उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार निशाणा साधलाय...हादगावमध्ये नागेश पाटलांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी मोदींवर चौफेर टीका केलीये...महाराष्ट्रातील जनता तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलाय...तर मंगळसूत्राचं महत्त्व तूम्हाला काय माहित असा सवालही उद्धव ठाकरेंनी मोदींना केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

24 Apr 2024, 14:14 वाजता

'फडणवीस हा एकच बाप असा भेटला पवारांना पुरुन उरला', सदाभाऊ खोतांची टीका

 

Sadabhau Khot On Sharad Pawar : माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केलीय...शरद पवारांचं आडनाव फडणवीस असतं तर त्यांना कोणीही विचारलं नसतं...देवेंद्र फडणवीस हा एकच व्यक्ती शरद पवारांना पुरुन उरलाय...म्हणून आज त्यांना या वयात सुद्धा खोटं बोलत रेटून चालावं लागतंय...अशी जळजळीत टीका सदाभाऊ खोतांनी पवारांवर केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

24 Apr 2024, 13:13 वाजता

'भाजप वॉशिंग मशीन झालीय', उद्धव ठाकरेंची सुनेत्रा पवारांवर टीका

 

Uddhav Thackeray : शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह सुनेत्रा पवारांना दिलासा मिळाल्यानंतर विरोधकांनी टीकास्त्र सोडलंय. उद्धव ठाकरेंनी भाजप वॉशिंग मशीन झाल्याची टीका केलीय. तर वडेट्टीवारांनी भ्रष्टाचार करणा-याला सोबत घेऊन सोडणार नाही असं कदाचित पंतप्रधानांना म्हणायचं असेल असं म्हटलंय. तर हा चौकशीचा भाग असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

24 Apr 2024, 12:33 वाजता

'भारतात वारसा कर लावण्याचा विचार व्हावा',सॅम पित्रोदांची मागणी 

 

Sam Pitroda : अमेरिकेतील वारसा कर भारतातही लावण्याचा विचार व्हावा अशी मागणी अनिवासी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केलीय...अमेरिकेमध्ये ज्यांचं उत्पन्न 100 मिलियन डॉलर आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीमधील 45 टक्के वाटा हा त्यांच्या वारशांना दिला जातो...तर इतर 55 टक्के वाटा हा सरकार दरबारी जमा होतो...भारतामध्ये अशा कायद्याबाबत चर्चा व्हावी अशी अपेक्षा सॅम पित्रोदांनी व्यक्त केलीय...तर पित्रोदा यांच्या वक्तव्यानं काँग्रेसचा हेतू समोर आल्याची टीका गृहमंत्री अमित शाहांनी केलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

24 Apr 2024, 11:54 वाजता

पंतप्रधान मोदींच्या 3 दिवसांत महाराष्ट्रात 7 सभा

 

PM Narendra Modi : लोकसभा निवडणूक ऐन रंगात आलीय. पहिला टप्पा पार पडलाय. दुसरा टप्प्याचा प्रचार आज थंडावणारेय. राज्यात सर्वपक्षीय नेत्यांच्या सभांचा, प्रचाराचा धडाका जोरदार सुरुय. मात्र त्यात सर्वात उठून दिसणारी बाब म्हणजे पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात लावलेल्या सभांचा धडाका. मोदींच्या चंद्रपूर, रामटेक, वर्धा, नांदेड, परभणीत सभा घेतल्यायत. आता पुढील 3 दिवसांत मोदी 7 सभा घेणारेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

24 Apr 2024, 11:23 वाजता

'तुमचा मुलगा शिंदेंसोबत का गेला?', सुनील तटकरेंचा सुभाष देसाईंना सवाल

 

Subhash Desai Vs Sunil Tatkare : रायगडमध्ये सुभाष देसाईंनी केलेल्या आरोपांना सुनील तटकरेंनी समाचार घेतलाय...सुभाष देसाईंचा मुलगा शिंदेंसोबत का गेला...? तुम्ही उद्योगमंत्री असताना करोडो रुपयांचा घोटाळा केलात त्याचं पाप लपवण्यासाठी मुलगा शिंदेंच्या पक्षात गेला त्याचं उत्तर द्या आणि मग माझ्यावर बोला...असं आव्हान सुनील तटकरेंनी दिलंय...माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी आपल्या भाषणात सुनील तटकरे यांचा उल्लेख गद्दार आणि भ्रष्टाचारी असा केला होता...त्यावर तटकरेंनी उत्तर दिलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

24 Apr 2024, 10:51 वाजता

'बच्चू कडू महाविकास आघाडी सोबत', नवनीत राणांचं वक्तव्य

 

Navneet Rana On Bachhu Kadu : बच्चू कडू मोठ्या भावासारखे...बच्चू कडू महायुतीत आहे का याबाबत शंका...बच्चू कडू महाविकास आघाडी सोबत-राणा...मविआच्या 11 जागांना बच्चू कडूंचं समर्थन..खासदार नवनीत राणा यांचं वक्तव्य

बातमीचा व्हिडीओ पाहा-

24 Apr 2024, 10:07 वाजता

'अमरावतीत हिंदू-मुस्लीम दंगल घडू शकते', बच्चू कडूंचा दावा

 

Bacchu Kadu : अमरावतीत हिंदू-मुस्लीम दंगल घडू शकते असा खळबळजनक दावा बच्चू कडूंनी केलाय... 26 तारखेपर्यंत निवडणुकीत काहीही होऊ शकतं असं कडूंनी म्हटलंय...त्यामुळेच आम्ही एक पाऊल मागे घेतलं असा दावा कडूंनी केलाय...गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला, त्यांनी सभा घ्यायला नको होती...या सर्व घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा फोन आला...मात्र, मी त्यांचा उचलणार नाही असं कडूंनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-