Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

25 Apr 2024, 12:12 वाजता

कोटक महिंद्रा बँकेवर RBIची कारवाई

 

Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेवर रिझर्व्ह बँकेनं कारवाई केलीय. ऑनलाईन पद्धतीनं नवे ग्राहक तयार करण्यावर आणि नवी क्रेडिट कार्ड जारी करण्यावरही निर्बंध घातलेयत. मात्र याचा खातेदारांवर कोणताही परिणाम होणार नाही. योग्य तंत्रज्ञानाअभावी ग्राहकांना त्रास होत असल्यानं, 2022-2023च्या तंत्रज्ञानाची RBIनं तपासणी केली आणि सुधारणा करण्यास सांगितलं. मात्र सततच्या इशा-यांनंतरही सुधारणा न केल्यानं RBIनं निर्बंध घातले. तज्ज्ञांच्या मते हे निर्बंध 3-6 महिने असू शकतात. आयटी इन्फ्रास्ट्रकचरमध्ये सुधारणा केल्यानंतर बँकेला ऑडिट करावं लागेल. तपासणी करून मगच आरबीआय निर्बंध हटवणारय. याचे मोठे परिणाम कोटक महिंद्रा बँकेला भोगावे लागणारयत. बँक क्रेडिट कार्ड कॉम्पिटिशनमध्ये मागे पडणार, बँकेच्या इन्कमवरही परिणआम होईल, खातेदारामध्ये विश्वासहार्ता कमी होईल. ऑनलाईन सेवांवही परिणाम होणार. नवे ग्राहक बनवताना अडचणी येणार. डिजिटल पेमेंट सर्विस प्लानमध्ये विलंबाची शक्यताही आहे. यामुळे इतर बँकांना विशेषत: SBI Cardsला फायदा होणारय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

25 Apr 2024, 11:46 वाजता

रक्षा खडसे आज उमेदवारी अर्ज भरणार

 

Raksha Khadse : रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत...अर्ज दाखल करण्यापूर्वी रक्षा खडसेंनी सासरे एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेतले...यावेळी एकनाथ खडसेंनी रक्षा खडसे ही माझी फक्त सून नसून ती माझी मुलगी आहे...तिला निवडणुकीत पूर्ण सहकार्य करून चांगल्या मताधिक्यासाठी प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिलीय...छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जाणारेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

25 Apr 2024, 11:14 वाजता

'पंकजांनी बीडच्या निवडणुकीकडे लक्ष द्यावं', छगन भुजबळांचा पंकजा मुंडेंना टोला

 

Chhagan Bhujbal on Pankaja Munde : प्रीतम मुंडेंना विस्थापित करणार नाही.. तर तिला नाशिकमधून उभी करेन.. या पंकजा मुंडेंच्या विधानाचा छगन भुजबळांनी चांगलाच समाचार घेतलाय.. पंकजा मुंडेंनी बीडच्या निवडणुकीकडे लक्ष द्यावं, तुम्ही बीडमधून निवडून येणं महत्त्वाचं आहे.. असा टोला भुजबळांनी लगावलाय.. नाशिकमधून वंजारी समाजाचे उमेदवारही राष्ट्रवादीकडे आहेत असंही भुजबळांनी म्हटलंय.. 

25 Apr 2024, 10:22 वाजता

संदिपान भुमरेंच्या प्रतिज्ञापत्रावरुन वाद

 

Sandipan Bhumre : लोकसभा निवडणुकीतील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्या पत्नीच्या उत्पन्नाच्या स्रोतात दोन दिवसांत मोठा बदल झालाय. सोमवारी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नीचा व्यवसाय शेती आणि घरकाम दाखवला होता, तर बुधवारी त्यांनी दाखल केलेल्या दुस-या अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पत्नीचा व्यवसाय शेती आणि मद्यविक्री परवाने असा दाखवण्यात आलाय.. भुमरेंनी प्रतिज्ञापत्रात दारू दुकानांची माहिती का दडवली, अचानक प्रतिज्ञापत्रात बदल का झाला याची चर्चा सुरू आहे..
 

25 Apr 2024, 10:02 वाजता

राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढणार?

 

Rahul Gandhi : राहुल गांधी अमेठीतूनही निवडणूक लढण्याची शक्यता..अमेठीत टीम राहुल गांधींची मोर्चेबांधणी...वायनाडसह अमेठीतूनही निवडणूक लढणार असल्याची शक्यता..1 मे रोजी राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरणार.. 27 एप्रिलला अमेठीतून लढणार असल्याची घोषणा करण्याची सूत्रांची माहिती.

25 Apr 2024, 09:41 वाजता

मुरलीधर मोहोळ, आढळराव पाटील  आज  उमेदवारी अर्ज भरणार

 

Murlidhar Mohol : पुण्यातील भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरुरमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील आज अर्ज भरतील. मुरलीधर मोहोळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करुन पदयात्रा काढतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, रामदास पाटील उपस्थित राहतील. मुरलीधर मोहोळ यांची काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर, वंचितच्या वसंत मोरेंशी लढत होणारेय. शिरुरमधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटीलही उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी आढळराव पाटलांकडून मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात येणारेय. शिरुरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत रंगणारेय. आढळरावांसमोर अमोल कोल्हेंचं आव्हान असणारेय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

25 Apr 2024, 09:14 वाजता

'पराभव होणार हे लक्षात आल्यानं टीका', शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

 

Sharad Pawar on Devendra Fadnavi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिलंय. आपला पराभव होणार हे त्यांच्या लक्षात आलंय त्यामुळे अशी टीका होतेय असा पलटवार पवारांनी केलाय. पवार सतत कोलांटउड्या घेतात अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली होती.

25 Apr 2024, 08:40 वाजता

संभाजीनगर मनपाला जलसंपदाची नोटीस

 

Sambhaji Nagar Water : संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा कधीही बंद होऊ शकतो. कारण महापालिकेने जलसंपदा विभागाचे 40 कोटी भरले नसल्यामुळे नोटीस बजावण्यात आलीय...शहराची तहान भागवण्यासाठी दररोज जायकवाडी धरणातून 130 ते 135 एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येतो. या पाण्याचं बिल दरमहा जलसंपदा विभागाला भरावं लागतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून मनपाने हे पैसे भरले नाहीत. त्यामुळे जलसंपदा विभागनाने महापालिकेला नोटीस पाठवलीय. पैसे न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा कोणत्याही क्षणी बंद केला जाऊ शकतो. दरम्यान पाणीपट्टीपोटी मनपाचे १५ कोटी रुपये थकीत आहेत, मात्र संबंधित विभागाने दंड आणि व्याज लावून ही रक्कम ४० कोटी केल्याचं मनपातील अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे.  

25 Apr 2024, 08:03 वाजता

'शिंदे भुजबळांना शिरुरची उमेदवारी देणार होते',अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट

 

Amol Kolhe on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांना शिरूर लोकसभेतून उमेदवारी देण्याचं शिंदेंच्या डोक्यात होतं, पण त्यांनी नकार दिला असा गौप्यस्फोट अमोल कोल्हेंनी केलाय...शिवाजीराव आढळराव यांचं ऑल इज वेल सारखं सुरू आहे... पराभव दिसत असला तरी डोळे झाकून मी जिंकू शकतो, जिंकू शकतो असं ते म्हणतायत...ऑल इज वेल सारखी ही स्थिती त्यांची झालीय...अशी टीका कोल्हेंनी आढळरावांवर केलीय...

25 Apr 2024, 07:40 वाजता

सांगलीत आज काँग्रेसचा मेळावा

 

Sangli Congress : सांगलीत आज काँग्रेसचा मेळावा पार पडणार आहे...विशाल पाटील यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय...प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणाराय...या मेळाव्याला विश्वजीत कदम, विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत.या बैठकीमध्ये विशाल पाटलांच्या बंडखोरी आणि त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याबाबत काँग्रेस नेत्यांना कार्यकर्त्यांना सूचना देण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय...सकाळी 11 वाजता सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात मेळावा होणाराय...