Ratnagiri Uddhav Thackeray : रत्नागिरीत उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Ratnagiri Uddhav Thackeray : रत्नागिरीत उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

28 Apr 2024, 23:07 वाजता

कोरोनापेक्षा भयंकर भाजपची हुकूमशाही, सत्ताबदलानंतर मोदींच्या घरगड्यांना दाखवू - उद्धव ठाकरे

 

Ratnagiri Uddhav Thackeray : रत्नागिरीमधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. समोरच्याला टोप घातल्यावर डोकं खाजवायला मिळत नाही आणि आज आपण कोणत्या पक्षात आहोत हेच त्याला कळत नाही अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता नारायण राणेंचा समाचार घेतला. तसंच स्वतःच्या उंचीनुसार तरी प्रकल्प कोकणात आणलात का, असा सवाल विचारत त्यांनी राणेंना डिवचलं.
उद्धव ठाकरे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतलाय....कोरोनापेक्षाही भाजपची हुकूमशाही भयंकर असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय...आमचं सरकार आल्यावर ED, CBI, IT या मोदींच्या घरगड्यांना दाखवून देऊ असा इशाराही त्यांनी दिला. या सभेसाठी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेसुद्धा उपस्थित होते.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

28 Apr 2024, 23:02 वाजता

शिंदेवाडीच्या 2 कुटुंबातील वादावादीत एक तरुण गंभीर जखमी

 

Pune Rada : पुण्यातील शिरूरमध्ये बैलगाडा घाटात जोरदार हाणामारी.. शिंदेवाडी येथील 2 कुटुंबातील वादावादीतून मारहाण.. मलठणच्या शिंदेवाडी यात्रेतील बैलगाडा शर्यतीतील घटना.. हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी. 

 

28 Apr 2024, 21:25 वाजता

2004मध्ये मुख्यमंत्री पद आलं होतं, नशिबात असतं तर मुख्यमंत्री झालो असतो- अजित पवार

 

Ajit Pawar's Regret : 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद आलं होतं. माझ्या नशिबात असतं तर मी मुख्यमंत्री झालो असतो, अशी खंत अजित पवारांनी बारामतीच्या शिर्सुफळ इथल्या सभेत व्यक्त केली. मुख्यमंत्री पद आलं होतं... मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिला, असा आरोपही अजित पवारांनी केला.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

28 Apr 2024, 19:22 वाजता

रमेश मोरे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

 

Raigad Ramesh More : रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा फटका बसलाय. माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश मोरे यांनी शेकापला सोडचिठ्ठी दिलीय. रमेश मोरे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मोरेंनी शरद पवार यांच्या सभेचं नियोजन केलं होतं. मोरे यांच्या पत्नी रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. लोकसभा निवडणुकीत शेकापसह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

28 Apr 2024, 18:27 वाजता

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी साहिल खानला 1 मेपर्यंत पोलीस कोठडी

 

Actor Sahil Khan Arrested : अभिनेता साहिल खान याला 1 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये. महादेव बेटिंग अॅप प्रकरणी अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांकडून अटक. मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन ही कारवाई केलीये. त्यांनंतर त्याला मुंबईत आणण्यात आलंय.. द लायन बुक नावाच्या एका अॅपमध्ये साहिल खान भागिदार असल्याची माहिती समोर येतीये.. आता साहिल खानच्या चौकशीतून महादेव बेटिंग अॅप प्रकरणी आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

28 Apr 2024, 14:12 वाजता

'20 मेपर्यंत तरी उमेदवार जाहीर करा', छगन भुजबळांचा महायुतीच्या नेत्यांना टोला

 

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी जागावाटप जाहीर करण्यावरुन महायुतीच्या नेत्यांना टोला लगावलाय.. 20 मेपर्यंत तरी उमेदवार जाहीर करा..असा टोला भुजबळांनी लगावलाय. आतातरी लवकर निर्णय होईल..अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केलीय.. 

 बातमीचा व्हिडीओ पाहा-

28 Apr 2024, 13:35 वाजता

'मतदान करताना भावनिक होऊ नका', अजित पवारांचं मतदारांना आवाहन

 

 

Ajit Pawar : मतदान करताना भावनिक होऊ नका, असं आवाहन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जनतेला केलंय. बारामतीच्या शिर्सुफळमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी 40 वर्षापूर्वी आलेल्या सुनेला मतदान करणार की मुलीला ? असा सवाल केला. सुनेला मान असतो, भावनिक होऊ नका, असंही अजित पवार म्हणाले. 

28 Apr 2024, 13:03 वाजता

ठाण्यातून नरेश म्हस्केंना उमेदवारी- सूत्र

 

Naresh Mhaske : ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीये... ठाण्यातून नरेश म्हस्केंचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. ठाणे लोकभा मतदारसंघातून प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक हे लढण्यास इच्छुक असताना नरेश म्हस्केंचं नाव समोर येत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.. लवकरच उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगीलतंय.. दरम्यान यावेळी काही नावांमध्ये बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.. 

28 Apr 2024, 12:15 वाजता

गुजरात, राजस्थानात ड्रग्जचे कारखाने

 

Drugs Factory Raid at Gujarat Rajsthan : गुजरात, राजस्थानात ड्रग्जच्या कारखान्यांवर छापेमारी करण्यात आली आहे..ड्रग्जच्या 3 कारखान्यांवर संयुक्त छापे टाकण्यात आले  आहेत...कारवाईत 300 कोटी रुपयांचं मेफेड्रोन ड्रग्ज जप्त...गुजरात ATS आणि NCBची कारवाई..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

28 Apr 2024, 11:41 वाजता

अर्चना पाटील, ओमराजे निंबाळकरांना नोटीस

 

Omraje Nimbalka : महाविकास आघाडी उमेदवार ओमराजे निंबाळकर व महायुती राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील या दोघांना निवडणुक आयोगाच्या पुन्हा नोटीसा...निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी बजावल्या नोटीसा..सभा रॅलीत झालेल्या व निवडणुक आयोगाकडे दाखल केलेल्या खर्चात ताफावत/ खर्च कमी दाखवला असल्याने कारणे दाखवा नोटीस...48 तासात उत्तर न दिल्यास खर्च शॅडो पथकाने दाखवलेला खर्च निवडणूक खर्चात दाखवला जाणार...ओमराजे निंबाळकर यांनी 19 लाख 60 हजार खर्च दाखवला तर शॅडो पथकाने 33 लाख 92 हजार खर्च झाल्याचा अहवाल...अर्चना पाटील यांनी 4 लाख 55 हजार खर्च दाखवला आहे तर शॅडो पथकाने हा खर्च 22 लाख 73 हजार असल्याचे म्हणटले आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-