Govinda : अभिनेता गोविंदाचा शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Govinda : अभिनेता गोविंदाचा शिंदे गटात प्रवेश

28 Mar 2024, 14:02 वाजता

पुणे भाजपात उमेदवाराविरोधात उफळली नाराजी

 

Pune Sanjay Kakade : पुणे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय...पुणे लोकसभा लढवण्यासाठी आपण इच्छुक असून, एबी फॉर्म भरेपर्यंत इच्छुकच राहणार असल्याचं काकडेंनी म्हटलंय...काकडेंनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या...त्यानंतर रवींद्र चव्हाणांनी पुण्यात जाऊन काकडेंची भेट घेतली....यावेळी वरिष्ठांना माझी नाराजी कळवल्याची माहिती काकडेंनी दिली...

28 Mar 2024, 13:39 वाजता

आनंदराव अडसूळ यांची नवनीत राणांवर जोरदार टीका

 

Anandrao Adsul On Navneet Rana : शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आनंदराव अडसूळ नाराज आहेत...अमरावतीतून नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली, त्यानंतर नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला...त्यावर बोलताना अडसूळांनी चोर रात्रीच्याच वेळेला येतात अशी तिखट प्रतिक्रिया दिलीये....अमरावीतमध्ये बच्चू कडूंपाठोपाठ अडसूळांचाही नवनीत राणांना विरोध आहे...त्यामुळे अमरावतीतील लोकसभा निवडणुकीची लढत महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते...

28 Mar 2024, 13:18 वाजता

महायुतीत काही जागांवर तिढा असल्यानं जागावाटप लांबणीवर?

 

Mahayuti Seat Allocation : महायुतीचं जागावाटप आज जाहीर होणार नाही.. महायुतीमध्ये नाशिक, यवतमाळ, रायगड, ठाण्यासह काही जागांवरील तिढा अद्याप कायम असल्याची सूत्रांची माहिती..उद्या पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

28 Mar 2024, 12:43 वाजता

रश्मी बर्वे यांचं जातप्रमाण पत्र रद्द

 

Ramtek Rashmi Barve : काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय, जात पडताळणी समितीकडून जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय. बर्वे रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आहेत..त्यामुळे काँग्रेससमोरच्या अडचणी वाढल्यात.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Mar 2024, 12:41 वाजता

आता डायरेक्ट आणि करेक्ट कार्यक्रम होईल - बच्चू कडू

 

Amravati Bacchu Kadu : नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडूंनी आक्रमक पवित्रा घेतलाय...आता कोणाशीही बैठक होणार नाही आता बैठकीचे विषय संपले...आता करेक्ट कार्यक्रम होईल...राणांच्या विरोधात बंडखोरी करू आणि राणांना पाडू असा इशाराच कडूंनी दिलाय...तर महायुतीने सोबत ठेवलं नाही तर त्याक्षणी महायुतीतूनही बाहेर पडू, असं कडूंनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -

28 Mar 2024, 12:28 वाजता

सुनील केदार यांची महायुतीच्या नेत्यांना धमकी

 

Sunil Kedar : काँग्रेस नेते सुनील केदारांनी महायुतीच्या नेत्यांना धमकी दिलीय. मला फाशी द्या अन्यथा घरात घुसून धडा शिकवण्याचा इशारा केदारांनी दिलाय.. इतकंच नाही तर ईव्हीएमची काळजी केदार घेईल असं विधानही केदारांनी केलंय. रामटेक लोकसभा मतदारसंघात जोरात प्रचाराला लागण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

28 Mar 2024, 11:56 वाजता

सांगलीसाठी काँग्रेस पंतप्रधानपद घालवणार का?-राऊत

 

Sanjay Raut : सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे विश्वजित कदमांना इशारा दिलाय. कुणी वैयक्तिक अडचणींमुळे भाजपला अप्रत्यक्ष मदत करायची असेल तर तसं शिवसेना होऊ देणार नाही, असा इशारा राऊतांनी दिलाय...कुणी प्रचारावर बहिष्कार घातला तर मविआसाठी धोकादायक ठरेल...सांगलीच्या एका जागेवरून काँग्रेस देशाचं पंतप्रधानपद घालवणार का?...असा सवालही राऊतांनी काँग्रेसला विचारलाय.

28 Mar 2024, 10:37 वाजता

नवनीत राणांना पाडणं हेच आमचं लक्ष - बच्चू कडू

 

Bacchu Kadu On Navneet Rana : खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीवरून बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केलीय... ज्यांनी भाजपचे कार्यालय फोडलं, मोदींना शिवीगाळ केली त्यांनाच भाजपने तिकीट दिलं, अशी टीका कडूंनी केलीय...आता राणांना पाडणं हेच आमचं लक्ष आहे...अबकी बार चारशे पार ही घोषणा आहे...एखादी जागा पडली तरी काही फरक पडणार नाही...तसंच महायुतीतून बाहेर पडण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागायची आता गरज नसल्याचं कडूंनी म्हटलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Mar 2024, 10:31 वाजता

मुंडेंनी आपल्या मतदारसंघात निवडून येऊन दाखवावं - जयंत पाटील

 

Jayant Patil Vs Dhananjay Munde : कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी मतदारसंघात निवडून येवून दाखवावं असं आव्हान शेकाप नेते आमदार जयंत पाटलांनी दिलंय. मुंडे भाऊ-बहीण एकत्र आले असले तरी बीडमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल असं ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी मुरुडमधल्या मेळाव्यात शेकापची अडीच हजार मतं जिल्ह्यात शिल्लक राहणार नाहीत अशी टीका धनंजय मुंडेंनी केली होती. त्याला जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. मुंडेंच्या बारश्याच्या घुग-या मी खाल्ल्यात, शेकाप संपणार नाही असं जयंत पाटील म्हणालेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

28 Mar 2024, 09:11 वाजता

मविआ नेत्यांची आज बैठक

 

Mumbai MVA Meeting : महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज दुपारी 4 वाजता महत्त्वाची बैठक होणाराय...ट्रायडंट हॉटेलमध्ये होणा-या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत...लोकसभा मतदारसंघाबाबत तिन्ही पक्षांमध्ये चुरस आहे...दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा होणार आहे...कालच उद्धव ठाकरेंनी 17 उमेदवारांची यादी जाहीर केल्याने काँग्रेस चांगलीच संतप्त झालीय...त्यानंतर तातडीने बैठक बोलावण्यात आलीय...त्यामुळे आजच्या बैठकीत काय तोडगा निघणार याकडे लक्ष लागलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा -