Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

29 Apr 2024, 20:52 वाजता

'आले तेव्हा टरबूज, आता पाव उपमुख्यमंत्री', उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

 

Uddhav Thackeray Live | Marathi News LIVE Today :  शिवसेनेमुळे मोदी त्या तख्तावर बसलेले...आता त्या  तख्तावर बसू देणार नाही...तुम्हाला केराच्या टोपलीत फेकणार होते..उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका..टरबुजाचं काय करायचं तुम्हाला माहिती...हे टरबूज दुष्काळात तेरावा महिना...आले तेव्हा टरबूज, आता पाव उपमुख्यमंत्री...आधी टरबूज होते, आता चिराट झाले..उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका

29 Apr 2024, 18:28 वाजता

'जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही',पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला टोला

 

PM Narendra Modi  : धर्माच्या नावावर आरक्षण देऊ देणार नाही... जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कराडच्या सभेत ठणकावून सांगितलं. साता-यातील भाजप उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. येत्या महिनाभरात देशात अनुचित घटना घडवण्याचा कट असल्याचा आरोपही मोदींनी यावेळी विरोधकांना उद्देशून केला.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

29 Apr 2024, 17:21 वाजता

मुंबई शहर, उपनगरात उष्णतेची लाट? 

 

State Heatwave : मुंबई शहर आणि उपनगरात उष्णतेची लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 24 तासांत उष्णतेची लाट निर्माण होण्याचा अंदाज आहे. यादरम्यान कमाल तापमान 38 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  

बातमीचा व्हिडीओ पाहा-

29 Apr 2024, 16:18 वाजता

मुंबईत काँग्रेसची गुप्त बैठक 

 

Mumbai Congress Secret Meeting : मुंबईत काँग्रेसची गुप्त बैठक सुरू...वर्षा गायकवाड यांच्या उमेदवारीविरोधात बैठक...नसीम खान, हंडोरे, भाई जगताप, सुरेश शेट्टी बैठकीला उपस्थित...MCA क्लबमध्ये बैठक सुरू आहे...वर्षा गायकवाड उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्या आधीच काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांची बैठक सुरूये.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

29 Apr 2024, 15:57 वाजता

'5 वर्षात 5 पंतप्रधान होत असतील तर...'पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंवर टीका

 

PM Narendra Modi  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या सभेत पुन्हा एकदा नकली शिवसेना असा उल्लेख केलाय. नकली शिवसेनेचे नेते एका वर्षात 4 पंतप्रधान करणार असल्याचं म्हणातात. 5 वर्षात 5 पंतप्रधान होत असतील तर एवढा मोठा देश चालणार कसा? असा सवाल मोदींनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

29 Apr 2024, 14:21 वाजता

पंकजा मुंडेंविरोधात मराठा तरुणांची घोषणाबाजी

 

Beed Pankaja Munde : पंकजा मुंडेंविरोधात माजलगाव तालुक्यातील लऊळ गावात घोषणाबाजी करण्यात आली.. एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी पंकजा मुंडेविरोधात करण्यात आली. पंकजांविरोधात मराठा तरुणांनी रोष व्यक्त केला..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Apr 2024, 14:07 वाजता

नारायण राणेंसाठी राज ठाकरे घेणार सभा

 

Loksabha Election 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत.. राज ठाकरेंची महायुतीसाठी ही पहिलीच सभा आहे.. 4 मेला संध्याकाळी 5 वाजता कणकवलीच्या उपरुग्णालयासमोरीत मैदानावर राज ठाकरेंची सभा होणार आहे..रत्नागिरीत मनसेच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी सभा घेतल्यानंतर आता स्वत: राज ठाकरे सभा घेणार आहेत.. एक ते दोन दिवसांत राज ठाकरेंच्या सभेसाठीचा दौरा निश्चित होणार आहे.

 

29 Apr 2024, 14:02 वाजता

शांतिगिरी महाराज महायुतीचे उमेदवार?

 

Loksabha Election 2024 : स्वामी शांतिगिरी महाराजांनी भरलेल्या अर्जावर शिवसेनेचं नाव असल्याची माहिती समोर आलीय...त्यामुळे शांतिगिरी महाराज हे शिंदे गटाकडून लढणार असल्याची चर्चा आहे...शिंदेंसोबत सकारात्मक चर्चा झाली होती...त्यामुळे प्रभू रामचंद्राची इच्छा असेल तर धनुष्यबाण मिळेल अशी सूचक प्रतिक्रिया शांतिगिरी महाराजांनी दिलीय...

29 Apr 2024, 12:14 वाजता

चंद्रशेखर बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

 

Chandrashekar Bawankule On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळेंनी उत्तर दिलंय, औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं..अशी टीका बावनकुळेंनी केलीय.. मोदी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती, त्याला बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात बावनकुळेंनी ट्विट करत काय उत्तर दिलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Apr 2024, 11:49 वाजता

आम्ही घराणेशाहीतून आलो हे मान्य - सुप्रिया सुळे

 

Supriya Sule : आपण घराणेशाहीतून आलो हे मान्यच आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.. अजित पवार, सुप्रिया सुळेंना सॉफ्ट लँडिंग मिळालं.. शरद पवारांनी शून्यातून विश्व निर्माण केलं असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. शरद पवारांवर होणा-या घराणेशाहीच्या आरोपांवर सुळेंनी प्रतिक्रिया दिली.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -