Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

30 Apr 2024, 22:18 वाजता

पुण्यात 7 महिन्याच्या चिमुकल्याचं अपहरण करणाऱ्या बेड्या

 

Pune Child Kidnapper Arrested : पुण्यातून एका 7 महिन्याच्या बालकाचं अपहरण करणा-या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. दोन दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनबाहेर आई-वडिलांसोबत झोपलेल्या बालकाला उचलून नेण्यात आलं होतं. एवढंच नाही तर त्या बालकाला विकण्यात देखील आल्याचा प्रकार समोर आलाय. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्यात. तर कर्नाटकातील विजापूरच्या एका हॉटेलमधून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. या कामगिरीमुळे पोलिसांचं कौतुक होत आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

30 Apr 2024, 21:00 वाजता

उत्तर मुंबईमध्ये काँग्रेसकडून भूषण पाटलांना उमेदवारी

 

North Mumbai Loksabha :  उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी भाजपकडून पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात आता भूषण पाटील विरुद्ध पियूष गोयल यांच्यात लढत होणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 Apr 2024, 18:20 वाजता

गिरीश महाजनांनी घेतली छगन भुजबळांची भेट

 

Girish Mahajan Meets Chagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरूये...या चर्चेमध्येच नाशिकचा उमेदवार ठरणार अशी माहिती सूत्रांकडून मिळालीये...गिरीश महाजन नाशिक दौ-यावर असून दिवसभर भेटीगाठी घेतल्यानंतर काहीवेळापूर्वी ते भुजबळांच्या भेटीला पोहोचले...पदाधिका-यांसोबत अर्धातास चर्चा झाल्यानंतर...भुजबळ आणि महाजनांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरूये...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

30 Apr 2024, 17:37 वाजता

भांडुपमध्ये टॉर्च लावून महिलांची प्रसूती, नवजात शिशूसह आईचा मृत्यू

 

Bhandup Hospital : भांडुपमध्ये सुषमा स्वराज पालिका प्रसुतीगृहामध्ये टॉर्च लावून महिलांची प्रसुती करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. एवढंच नाही तर सिझर करताना नवजात शिशूचा आणि एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानं तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिचादेखील मृत्यू झालाय. विद्युतपुरवठा खंडित झाल्यांना डॉक्टरांवर टॉर्च लावून प्रसुती करण्याची वेळ आलीय. महिलेच्या मृत्युमुळे महिलेच्या कुटुंबीयांनी संपात व्यक्त केलाय. ईशान्य मुंबई उपनगरातील प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची पहिलीच घटना नाही. त्यामुळे या भागात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. तसेच, संबंधित डॉक्टर आणि कर्मचा-यावर कारवाईची मागणी करण्यात येतेय. राज्यात एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना हा प्रकार घडलाय. त्यामुळे राजकीय नेत्यांनी या घटनेकडं लक्ष देण्याची गरज आहे.

30 Apr 2024, 17:26 वाजता

द. मुंबईमधून शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधवांना तिकीट

 

South Mumbai Loksabha : महायुतीचा दक्षिण मुंबईचा तिढा सुटलाय...दक्षिण मुंबईची जागा शिवसेना लढवणार आहे...शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये...आता दक्षिण मुंबईमध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत असा सामना रागणारे...

30 Apr 2024, 16:56 वाजता

 2 मे रोजी श्रीकांत शिंदे कल्याणमधून उमेदवारी भरणार अर्ज

 

Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे 2 मे रोजी लोकसभा उमेदवारी अर्ज भरणार आहेत...कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेनेतर्फे ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत...महायुती मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत डोंबिवली येथे हा अर्ज भरणारे...डोंबिवलीच्या गणेश मंदिर येथून ही रॅली काढण्यात येणारे...

30 Apr 2024, 16:15 वाजता

कल्याणमध्ये ठाकरे गटाला पुन्हा खिंडार

 

Vivek Khamkar : कल्याणमध्ये ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडलंय...ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर शिंदे गटात प्रवेश करणारेत...वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी खामकर गैरहजर होते...त्यांच्यासह कल्याण-डोंबिवलीतील अनेक पदाधिकारीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारेत...पक्षात महत्त्व मिळत नसल्याचा आरोप खामकर यांनी केलाय..

30 Apr 2024, 15:57 वाजता

वर्ल्ड कप T-20साठी टीम इंडियाची घोषणा

 

T-20 world Cup : टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून 19 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार असून हार्दिक पांड्या टीम इंडियाचा उपकर्णधार असणार आहे. टीम इंडियामधून केएल राहुलला डच्चू देण्यात आला असून ऋषभ पंतची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे.

30 Apr 2024, 15:03 वाजता

'सामान्यांच्या संपत्तीवर काँग्रेसची नजर',पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

 

PM Narendra Modi Live | Marathi News LIVE Today : काँग्रेसनं देशाला फक्त गरिबी दिली...संपत्ती लुटण्याचा काँग्रेसचा प्लॅन...सामान्यांच्या संपत्तीवर काँग्रेसची नजर...लुटणाऱ्या पंजाला साथ दिली पाहिजे?..काँग्रेसनं फक्त एकाच परिवाराचा विचार केला...पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल... 2014मध्ये दहशतवाद, बॉम्बस्फोट...आता भारत घरात घुसून मारतो...पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला...2036 मध्ये ऑलिम्पिक भरवण्याचं स्वप्न...काँग्रेसच्या काळात देश असुरक्षित होता...आज भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था...पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य..

30 Apr 2024, 13:52 वाजता

भाजप संविधान बदलणार हे निराधार - अमित शाह

 

Amit Shah : संविधान बदलण्यासाठी, आरक्षण हटवण्यासाठी भाजपनं 400पार जागांचा नारा दिलाय, असा आरोप काँग्रेसकडून सातत्यानं होतोय. काँग्रेसचे हे आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी खोडून काढलेत. हे आरोप निराधार आणि तथ्यहीन असल्याचं अमित शाहांनी म्हटलंय. 10 वर्ष भाजपकडे बहुमत होतं, बहुमताचा वापर 370हटवणं, तिहेरी तलाख, राम मंदिरासाठी अनुकूल वातावरण तयार करायला केला असं अमित शाहांनी म्हटलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -