उदय सामंताचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल, मतदानाच्या दिवशीच कोकणात हायव्होल्टेज ड्रामा

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरवात झाली आहे. रत्नागिरी सिंधदुर्ग मतदार संघात नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 7, 2024, 01:00 PM IST
उदय सामंताचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल, मतदानाच्या दिवशीच कोकणात हायव्होल्टेज ड्रामा title=
lok sabha election third phase shivsena mla udya samant brother kiran samant not reachable ahed of election

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यातील 11 मतदारसंघात आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात बारामती, सोलापुर, माढा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आज मतदान होत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे विरुद्ध राऊत असा सामना होत आहे. कोकणात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कोकणात आज मतदान होत असताचा रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरणारे आहे. 

सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. सकाळपासून किरण सामंत यांचा फोन नॉटरीचेबल असल्याचे समजतेय. कार्यकर्ते किरण सामंत यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न अयशस्वी होत आहे. किरण सामंत हे कार्यकर्त्यांच्या संपर्कात नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

 महाराष्ट्रात कोणत्याही नेत्याचा फोन नॉट रिचेबल झाल्यावर काहीतरी भयानक घडत असेल. पण इथे काही घडणार नाही. माझ्याकडे ग्रामीण भाग आहे. शेवटी एक कुटुंब आणि राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे. प्रत्येकांमध्ये समज-गैरसमज झाले असतील तर आम्ही कुटुंब सक्षम आहोत मार्ग काढण्यासाठी. एखादा व्यक्ती नॉट रिचेबल आहे म्हणजे माणूस वेगळेच काहीतरी करतो, ही भावना  निर्माण करणे हे पण लोकशाहीमध्ये एक आक्षेप घेतल्यासारखे आहे. सगळं काही व्यवस्थित सुरू आहे, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी झी 24 तासशी बोलताना दिली आहे. 

तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान

तिसऱ्या टप्प्यासाठी 95 जागांसाठी मतदान पार पडणार होते. मात्र, सुरत इथं कॉंग्रेस उमेदवाराने अर्ज परत घेतल्यानं आणि जम्मू काश्मीरमधील हवामान खराब असल्यानं अनंतनाग-राजौरी इथं मतदान तिसऱ्या टप्प्यात होणार नाही. आता अनंतनाग राजौरी लोकसभेसाठी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 10 राज्य आणि 1 केंद्रशासीत प्रदेशातील 93 जागांवर मतदान होत आहे.