'निलेश लंके तूझी कशी जिरवायची हे मला चांगलं माहित आहे' अजित पवारांचा थेट इशारा

Loksabha 2024 : निलेश लंके तू किस झाड की पत्ती है, असं म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना इशारा दिला आहे. निलेश लंकेचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा असंही अजित पवार यांनी म्हटलंय.

Updated: May 10, 2024, 06:00 PM IST
'निलेश लंके तूझी कशी जिरवायची हे मला चांगलं माहित आहे' अजित पवारांचा थेट इशारा title=

Loksabha 2024 : महाराष्ट्रात माझ्या नादी लग्नाऱ्यांचा मी पुरता बंदोबस्त केलाय. निलेश लंके 'तू किस झाड की पत्ती है' असं म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी महविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना थेट धमकी दिली आहे. अहिल्यानगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांच्या प्रचार्थ पारनेर इथं अजित पवार बोलत होते.  महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखेपाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला. मागच्या वेळी निलेशला तिकीट देऊन चूक झाली. अगोदर हा गरीब वाटला. नंतर समजलं हा गुंड पाठवून लोकांना त्रास देतो. कलेक्टरला ये कलेक्टर म्हणतो, पोलिसांचा बाप बनतो, निलेश बेटा तू ज्या शाळेत शिकतो त्याचा मी हेडमास्तर आहे. तू आता आमदार नसुन, कॉमनमॅन झालाय. तुझा कंड कसा जिरवायचा हे मला चांगलं  माहीत आहे. असं म्हणत अजित पवार यांनी निलेश लंके यांना सुनावलं आहे. 

अजित पवारांचा थेट इशारा
आपल्या भाषणात अजित पवार यांनी निलेश लंके यांना चांगलच सुनावलं आहे. निलेश माझ्या नादी लागू नकोस महाराष्ट्रात जे कोणी माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय, मी जोपर्यंत शांत आहे तोवर शांत आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्यास तर मी तुझ्या मागे लागेन. ग्रामीण भागात एक शब्द आहे. कंड जिरवतो, तुझा असा कंड जिरवेन की तुला डोळ्यासमोर सारखा अजित पवार दिसेल. अशा शब्दात अजित पवार यांनी इशारा दिला आहे. आता तो आमदार नाही, त्यामुळे त्याची अरेरावी अधिकाऱ्यांनी सहन करु नये, आता कोणी अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका असं आवाहनही अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय. 

लोकसभा निवडणुकीत या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा गडी पुरता वाया गेलाय, आता त्याला घरी पाठवल्याशिवाय पर्याय नाही, लंकेचं पार्सल घरी पाठवण्याचं काम करायचं असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे. 

अजित पवारांची नाराजी
बारामतीमध्ये अपेक्षित मतदान झालं नसल्याबद्दल देखील अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी पुण्यात बैठक झाली. यावेळी अजित पवार यांनी निवडणुकीदरम्यान प्रचारामध्ये राहिलेल्या त्रुटी किंबहुना झालेल्या चुकांचा पाढा वाचल्याची चर्चा आहे. पुण्यातील सभेत पंतप्रधानांनी शरद पवार यांचं नाव न घेता भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. याविषयी देखील अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. 

शिरुरच्या सभेत अशोक पवारांना इशारा
त्याआधी अजित पवारांनी अशोक पवारांवर निशाणा साधला. शरद पवार यांनी शिरूर इथल्या प्रचार सभेत बोलताना शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना मंत्रीपदाची संधी देण्यात येईल आजपर्यंत आंबेगावला मंत्रिपद मिळाल्याने शिरूरकरांची खदखद होती मात्र आता ते सोडून गेल्याने शिरूरला मंत्री पदाची संधी मिळेल असं विधान केलं होतं. यावर अजित पवार यांनी अशोक पवारांवरती निशाणा साधला. तू मंत्री व्हायला निघालास तू आमदारच कसा होतो तेच पाहतो असं म्हणत आमदार अशोक पवारांना आव्हान दिलं. मला अजित पवार म्हणतात मी पण चॅलेंज देतो तु आमदारच कसा होतो तेच पहातो म्हणत शरद पवार गटाच्या पुणे जिल्ह्यातील एकमेक आमदारा वरती अजित पवारांनी निशाना साधलाय..