बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान सुरु असून यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या हाय व्होल्टेज लढाईकडे सर्वांचंच लक्ष आहे.

अरूण म्हेत्रे | Updated: May 7, 2024, 02:40 PM IST
बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी title=

Loksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान सुरु असून यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या (Baramati Loksabha Constituency) हाय व्होल्टेज लढाईकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. बारामतीत पवार वि. पवार (Pawar vs Pawar) अशी लढत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आमने सामने आहेत. तिसऱ्या टप्प्यात मतदान सुरु असतानाच बारामतीत नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी पोहोचल्या.

सुप्रिया सुळे बराच वेळ अजित पवारांच्या घरी होत्या. त्यानंतर त्या निघून गेल्या. कारण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नणंद भावजयीच्या लढाईकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. आई प्रतिभा पवार, लेक रेवती सुळे यांच्यासोबत मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांचं घर गाठलं.  मात्र या भेटीनंतर राजकीय चर्चांनाही उधाण आलं.  आता या भेटीमागचं कारण सुप्रिया सुळेंनीच सांगितलं. 

सुप्रिया सुळेंच्या भेटीमागे काय दडलंय?
अजित पवारांच्या आई म्हणजे आशाकाकींना नमस्कार करायाला आणि त्यांचा आशिर्वाद घ्यायला आपण आलो होतो, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय. माझ्या आयुष्यातील प्रत्येक शाळा आणि कॉलेजच्या सु्ट्टीत आशाकाकींच्या घरात दोन महिने राहायची. जेवढं माझ्या आईने माझं केलं नसेल तेवढं मोठ्या काकी, आशा काकी, सुमती काकी आणि भारती काकीने माझं केलंय. आशाकाकींच्या हातचे मलिदाचे लाडू आणि चपातीचे लाडू जगात भारी असतात अंस सांगायलाही सुप्रिया सुळे विसरल्या नाहीत.

अजित पवार गटाची टीका
सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या आई आशाताईंबाबत भावनिक आठवणी सांगितल्या असल्या तरी यावरुनच आता भावनिक राजकारण सुरु झालंय. दीड महिने आशाकाकी बारामतीमध्ये होत्या, तेव्हा सुप्रिया सुळे त्यांना भेटायला का गेल्या नाहीत अशी टीका अजित पवार गटाकडून करण्यात आलीय...

पवार कुटुंबातले राजकीय वाद वेगळे आणि कौंटुबिक संबंध वेगळे असणार हेच सुप्रिया सुळेंच्या भेटीतून स्पष्ट होतंय. मात्र या भेटीनंतर बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

बारामतीत पैसे वाटल्याचा आरोप
बारामतीमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आलाय. इंदापूर आणि बारामतीमध्ये पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवारांनी विरोधकांवर केलाय. पैशांच्या वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर केल्याचाही आरोप रोहित पवारांनी केलाय. रोहित पवार यांनी आज आपले वडील राजेंद्र पवार ,आई सुनंदा पवार, पत्नी कुंती पवार, बहीण सई पवार यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान रोहित पवार यांना तात्काळ अटक करा अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आलीय...