Loksabha Nivadnuk 2024 : महायुतीतील जागावाटपाचा सस्पेन्स आज संपणार; शिंदे गटानं अंतिम टप्प्यात चालली शेवटची चाल

Loksabha Nivadnuk 2024 : महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटत असतानाच शिंदे गटानं शेवटची चाल चालली. दरम्यान, आता हा तिढा सुटणार असून, जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.   

सायली पाटील | Updated: Mar 28, 2024, 06:12 PM IST
Loksabha Nivadnuk 2024 : महायुतीतील जागावाटपाचा सस्पेन्स आज संपणार; शिंदे गटानं अंतिम टप्प्यात चालली शेवटची चाल  title=
Loksabha Election 2024 mahayuti seats allocation will be declared soon after

Maharashtra Loksabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी बुधवारी रात्री राज्यस्तरीय बैठक पार पडली. जवळपास दोन तास ही बैठक झाली. या बैठकीत जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली. महायुतीतील जागावाटपासंदर्भात झालेल्या या बैठकीनंतर शिवसेनेच्या 8 जागांची घोषणा मुख्यमंत्री शिंदे करु शकतात अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. 

फक्त शिवसेनेच्याच जागा नव्हे, तर गुरुवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषदही होणार आहे. या पत्रकार परिषदेत जागावाटपाची घोषणा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील. त्यामुळे महायुतीतला जागावाटपाचा सस्पेन्स आज संपणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

हेसुद्धा वाचा : Dindori LokSabha : दिंडोरीचा किल्ला भाजप राहणार? भारती पवारांना कोण देणार टक्कर?

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी सिंधूदुर्ग मतदारसंघ भाजपकडे आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधूदूर्ग मतदारसंघातून नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.