Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी राज्यासह देशातील काही मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्रात नेमकं कसं मतदान झालं पाहा...  

सायली पाटील | Updated: May 8, 2024, 08:26 AM IST
Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?  title=
Loksabha Election 2024 third phase voting overall percantage baramati on backfoot

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान मंगळवारी पार पडलं. यावेळी देशातील 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांसाठी मतदान घेण्यात आलं. या तिसऱ्या टप्प्यामध्ये देसभरात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. जिथं महाराष्ट्रात तुल्यबळ लढतींमुळं मतदान प्रक्रियेलाही विशेष महगत्त्वं प्राप्त झालं होतं तिथं देशातही चित्र वेगळं नव्हतं. 

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वतीनं दिलेल्या माहितीनुसार देशात तिसऱ्या टप्प्यामध्ये 65.5 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक मतदान करणाऱ्या राज्यांमध्ये 81.71 टक्क्यांसह आसाम आघाडीवर राहिलं तर, त्यामागोमाग पश्चिम बंगालमध्ये 76.52 टक्के मतदान झालं. टक्केवारीच्या बाबतीत महाराष्ट्रात एकूण आकडेवारी सुधारली असली तरीही ही 61.44 टक्के मतदान ही आकडेवारी समाधानकारक मानली जात आहे. 

हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटेमध्येच राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज 

बारामतीत मतदारांचा थंड प्रतिसाद  

महाराष्ट्रात बुधवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 61.44 टक्के मतदान झाल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पाहता सर्वाधिक मतदान कोल्हापुरात झाल्याचं स्पष्ट झालं. तर, बारामतीत मात्र मतदारांनी निवडणूक आणि मतदान प्रक्रियेला थंड प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं.  वाढता उकाडा हे अनेक मतदारसंघांमध्ये मतदारांपुढे उभं ठाकलेलं आव्हान ठरलं. तर, बारामती मतदारसंघात एकंदर सुरु असणारा वाद आणि उमेदवारांमध्ये असणारी लढत पाहता या कारणास्तव मतदारांचा हा थंड प्रतिसाद मिळत असल्याचं म्हटलं गेलं. आता राज्यासह मुख्यत्वे बारामतीला मतदार नेमका कोणाला कौल देणार हेच पाहण्यासाठी अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

राज्यातील मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे

बारामती – 56.07 टक्के
सोलापूर – 57.61 टक्के 
रायगड - 58.10 टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-  59.23 टक्के
लातूर - 60.18 टक्के 
उस्मानाबाद -  60.91 टक्के
सांगली - 60.95 टक्के
माढा – 62.17 टक्के
सातारा -  63.05 टक्के
हातकणंगले - 68.07 टक्के
कोल्हापूर -  70.35 टक्के

देशात तिसऱ्या टप्प्यासाठीच्या मतदान प्रक्रियेमध्ये 8.39 कोटी महिलांसह एकूण 17.24 कोटी मतदार या प्रक्रियेस पात्र होते. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्य़ामध्ये देश स्तरावरील आकडेवारीनुसार अनुक्रमे 66.14 आणि 66.71 टक्के इतकं मतदान झालं. ज्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील आकडेवारी अंशत: कमी असल्याचं आढळलं. आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये नेमकं किती टक्के मतदान होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.