Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...

Loksabha Election 2024 Nashik : दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असतानाच नाशिकमधून आली राजच्याच्या राजकारणाती मोठी बातमी. छगन भुजबळ यांची खेळी की आणखी काय?   

सायली पाटील | Updated: Apr 26, 2024, 11:32 AM IST
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...  title=
Loksabha Eletcion 2024 chhagan bhujbal close allies Dilip khaire files nomination form from nashik constituency

Loksabha Election 2024 Nashik : राज्यात बहुचर्चित अशा नाशिक मतदारसंघातून महायुतीत नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याचीच चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती. त्यातच छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळं ही जागा नेमकी कोणाकडे जाणार यासाठी तर्क लावले जात असतानाच आता या मतदारसंघानं पुन्हा एकदा संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं आहे. 

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी माघार घेतली असली तरीही त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्यानं खळबळ उडालीय. दिलीप खैरेंचे बंधू अंबादास खैरे यांनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

हेसुद्धा वाचा : ICICI Bank चे अनेक क्रेडिट कार्ड रातोरात ब्लॉक, तुम्हीही या कार्डधारकांपैकी एक आहात का? 

छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असं भाजपला वाटतंय, त्यामुळे भुजबळांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार ही बाब इथं समोर येत आहे. एका बाजूला शिंदे गटातून हेमंत गोडसे, अजय बोरस्ते तर भाजपकडून स्वामी शांतिगिरी महाराज येथील जागेसाठी बाशिंग बांधून बसलेले असतानाच दुसरीकडे दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्यानं भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.

भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ते आपल्याच गटातील इतर कोणा विश्वस्तांना उमेदवारीसाठी पुढे करतील अशी शक्यताही दूरदूरपर्यंत कोणी व्यक्त केली नव्हती. पण, ही नवी खेळी समोर आल्यामुळं आता नेमकं राजकीय समीकरण कसं असेल याचीच राजकीय चर्चा आता नाशिकमध्ये सुरु आहे. नाशिकमध्ये भुजबळांच्या नावासाठी असणारा नकारात्मक सूर पाहता, एकूणच महायुतीत आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीसुद्धा ते नाशिकबाहेर पडले नसून, नाशिक मतदारसंघातूनच ते सुत्र चावलत असल्याचं म्हटलं जात आहे. अनेकांनी हा डमी अर्ज घेण्यात आला असून, खुद्द भुजबळच या जागेवर उभे राहू शकतात अशीही दाट शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं नाशिक मतदार संघावर राष्ट्रवादीचाच दावा राहतो का, यावर आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.