Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्ट

Maharashtra Weather News : देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात हवामानाची विचित्र स्थिती. कुठे हिमवृष्टी, कुठे उष्णतेची लाट तर, कुठे पावसाच्या सरी...   

सायली पाटील | Updated: May 2, 2024, 07:24 AM IST
Maharashtra Weather News : काळजी घ्या! कोकणाची होरपळ सुरुच; राज्याच्या 'या' भागात उष्णतेचा यलो अलर्ट title=
Maharashtra Weather News rainy days in north maharashtra heatwa ve in konkan

Maharashtra Weather News : देश पातळीवर सध्या हवामानात असंख्य बदल होत असून, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत राज्याराज्यानुसार तापमानाच मोठे चढ उतार होताना दिसत आहेत. आयएमडीच्या माहितीनुसार उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये सुरु असणाऱ्या हिमवृष्टीचा थेट परिणाम देशातील मैदानी क्षेत्रांवर होताना दिसत आहे. परिणामी दिल्ली आणि उत्तर भारतामध्ये तापमानात घट नोंदवली जाऊ शकते. पण, ही घट समाधानकारक नसेल ही वस्तूस्थिती. पूर्वोत्तर भारतात मात्र पावसाची हजेरी असेल. तर, केरळ, तामिळनाडूमध्ये किनारपट्टी भागांवर पावसाचे ढग एकवटताना दिसणार आहेत. 

महाराष्ट्रात सध्या उष्णतेचा दाह आणखी वाढला असून, सर्वाधिक तापमानाची नोंद वर्धा येथे करण्यात आली आहे. वर्ध्यात तापमान 42.5 अंशांवर पोहोचवलं असून, तिथं चंद्रपूर, यवतमाळमध्ये उष्णतेच्या लाटेचा आणि वर्ध्यामध्ये उष्ण रात्रीचा यलो अलर्ट जाही करण्यात आला आहे. 

देशात सध्या मध्य प्रदेशपासून कर्नाकचा अंतर्गत भाग आणि तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, परिणामस्वरुप महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांणध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. 

स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या माहितीनुसार लडाख, मुजफ्फराबाद, बाल्टीस्तान, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, गंगेच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये येणाऱ्या उप हिमालयीन पट्ट्यामध्ये उष्णतेची स्थिती निर्माण होऊ शकते.