'फडणवीसांसह भाजपा नेत्यांना अटक करणार होते', CM शिंदेंच्या आरोपाला राऊतांचं प्रत्युत्तर, 'कुठे जाऊन रडलात ते....'

Sanjay Raut on Eknath Shinde: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा (BJP) नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रत्युत्तर दिलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 22, 2024, 11:41 AM IST
'फडणवीसांसह भाजपा नेत्यांना अटक करणार होते', CM शिंदेंच्या आरोपाला राऊतांचं प्रत्युत्तर, 'कुठे जाऊन रडलात ते....' title=

Sanjay Raut on Eknath Shinde: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा (BJP) नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ माजली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या आरोपाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे अटक टाळण्यासाठी कुठे कुठे जाऊन रडले हे त्यांनी सांगावं असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले आहेत. भाजपात खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

एकनाथ शिंदे काय म्हणाले आहेत?

"महाविकास आघाडी सरकार 2022 मध्ये सरकार कोसळण्याआधी आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची योजना होती. एखाद्या प्रकरणात गुंतवून त्यांना अटक करण्याचा डाव होता. तसंच 2024 च्या निवडणुकीसाठी आमदार फोडण्याची योजना आखण्यात आली होती," असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

तुमची जेलवारी टळणार नाही - संजय राऊत 

एकनाथ शिंदेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.  भाजपात भ्रष्टाचाऱ्यांना आणि खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे. पक्षात गेल्यानंतर खोटं बोलण्याचं प्रशिक्षण दिलं जात असून एकनाथ शिंदे, अजित पवार रेटून खोटं बोलत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. 

"एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरुन पळाले. शिवसेनेत असताना त्यांना भाजपा जेलमध्ये टाकणार होतं. त्यांनी आपल्या तुरुंगात जायचं नाही सांगत कुठे कुठे जाऊन रडले हे सांगावं. ते खोटं बोलत आहेत. भाजपात भ्रष्टाचाऱ्यांना आणि खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे. किंवा भाजपात एखादा व्यक्ती गेला की त्याला खोटं बोलण्याचं प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये दिलं जातं. तुम्ही कसं खोटं बोललं पाहिजे, आरोप केले पाहिजेत याचं प्रशिक्षण देतात. त्यानुसार एकनाथ शिंदे, अजित पवार रेटून खोटं बोलत आहेत. आज जरी जेलवारी टळली असली तरी उद्या टळणार नाही हा आमचा इशारा आहे," असं संजय राऊत म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती - चंद्रकांत पाटील

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनीही सोलापुरात सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांना कुठल्याही क्षणी अटक झाली असती असा गौप्यस्फोट केला होता. देवेंद्र फडणीस यांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. मी राज्याचा अध्यक्ष होतो 33 महिने आम्ही काय सहन केल आहे हे आम्हाला माहित आहे. पण मला खात्री होती हेही दिवस जातील आणि ते दिवस गेले कोणाच्या ध्यानीमनी नसतानाही एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीच्या राज्यातील सत्तेच्या काळात अशी वेळ आली होती असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.