एप्रिलमध्ये उन-पावसाचा खेळ, 'या' तारखेपर्यंत राज्यात गारपिटीसह पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाच्या सरी बरसू शकतात. हवामान विभागाने यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 7, 2024, 09:52 AM IST
एप्रिलमध्ये उन-पावसाचा खेळ, 'या' तारखेपर्यंत राज्यात गारपिटीसह पावसाचा इशारा  title=
Update IMD Rain Alert madhya maharashtra vidarbh marathwada from 7 to 10 april

Maharashtra Weather Update: मुंबईसह राज्यातील अनेक भागांत उन्हाचा कडाका वाढला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली असतानाच आता हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यात 7 ते 10 एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 

राज्यात कमाल तापमानाने उसळी घेतली आहे. बहुंताश ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला होता. मुंबई शहर आणि उपनगरातही उन्हाची काहिली जाणवत आहे. दुपारी 12 ते 3 या काळात उकाडा प्रचंड वाढतो. घराबाहेर पडणेही मुश्कील होते. रात्रीही उकाड्याने झोप येणे मुश्लिक होते. मार्चमध्येच उन्हाचा पारा 40 पार गेला होता. तर, एप्रिल-मेमध्ये उन्हाचा पारा आणखी वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, एप्रिलच्या सुरुवातीलाच पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

7 ते 10 एप्रिल या काळात राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. 
विदर्भात काही ठिकाणी ऑरेंज अलर्टसह गारपीट होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. 

विदर्भ, मराठवाडा मध्यम अवकाळी पावसाबरोबर गारपिटीची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात तसेच गोव्यात 7 एप्रिल रोजी दिवसा उष्णतेचा अनुभव येईल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. महाराष्ट्रात जरी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी आंध्रप्रदेश, रायलसीमा, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, झारखंड, उत्तर अंटार्टिका, झारखंड, कर्नाटक आणि ओडिशा या भागात उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. 

उष्माघात रोखण्यासाठी काय करावे?

उन्हात शारीरिक कष्टाची कामे करणे टाळा. तसंच, दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाणे टाळा. उन्हात चप्पल न घालता अनवाणी चालू नये. भरउन्हात चहा-कॉफी इत्यादी गरम पेये टाळावीत. भर दुपारी गॅस किंवा स्टोव्हसमोर स्वयंपाक करणे टाळावेत.