2021 Force Gurkha: महिंद्रा थारला आव्हान देणार ही एसयूव्ही, जाणून घ्या वैशिष्ट्ये

या गाडीची संकल्पना कंपनीने गेल्या वर्षी ऑटो एक्सपोमध्ये दाखवली होती

Updated: Sep 13, 2021, 08:39 PM IST
2021 Force Gurkha: महिंद्रा थारला आव्हान देणार ही एसयूव्ही, जाणून घ्या वैशिष्ट्ये  title=

मुंबई : महिंद्राच्या एसयूव्ही थारला (mahindra thar) आव्हान देण्यासाठी या आठवड्यात एक नवीन एसयूव्ही (SUV) येत आहे. या गाडीचं नाव '2021 फोर्स गुरखा' (2021 Force Gurkha) असं आहे. लॉन्च होण्यापूर्वीच या गाडीची काही वैशिष्ट्य समोर आली आहेत.

या गाडीची रचना, वैशिष्ट्ये आणि लुकचा यात समावेश आहे. अलीकडेच फोर्स मोटर्सने या जबरदस्त एसयूव्हीचा टीझर देखील जारी केला आहे. या गाडीची संकल्पना कंपनीने गेल्या वर्षी ऑटो एक्सपोमध्ये दाखवली होती. रुंद लोखंडी जाळी, गोल आकाराचे एलईडी हेडलाइट्स या एसयूव्हीचे मुख्य आकर्षण असतील. त्याच्या हेडलाइट्सवर गुरखाचा बॅजिंग देखील दिसेल.

नवीन गुरख्यामध्ये ड्रायव्हर साइड स्नोर्कल व्यतिरिक्त, नविन डिझाइन केलेलं बोनेट देखील आहे. 2021 गुरखा एसयूव्हीला सक्षम वाहन बनवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. फोर्स गुरखासाठी खास डिझाइन केलेले टेललाइट्स, चाकांचा नवीन संच, टेलगेट-माऊंटेड स्पेअर व्हील आणि एक कार्यात्मक छप्पर वाहक दिसेल.

फोर्स मोटर्सने गाडीच्या आतील वैशिष्ट्यांबद्दलही माहिती दिली आहे. ज्यात ऑल-ब्लॅक कलर थीम देखील मिळण्याची शक्यता आहे. केबिनमध्ये मोल्डेड फ्लोअर मॅट, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल इन्फोटेनमेंट स्क्रीन लावण्यात आले आहेत. 

2021 फोर्स गुरखाच्या चार आसनी आवृत्तीला मागील बाजूस जागा असेल. मागे बसणाऱ्या दोन लोकांसाठी आर्मरेस्ट देखील असतील. सीट्सवर गुरखा बॅजिंग त्याला प्रीमियम टच देईल. महिंद्रा थारप्रमाणे, या एसयुव्हीला मोठ्या खिडक्या देखील असतील. 2021 फोर्स गुरखा एसयूव्हीला 2.6-लिटर डिझेल इंजिन असेल. 

इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्समध्ये 4X4 मोडसाठी स्वतंत्र गिअर लीव्हरसह येईल. सध्या, गुरखाची भारतात फक्त महिंद्रा थारशी स्पर्धा आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन फोर्स गुरख्याची किंमत ₹ 10 लाख ते ₹ 12 लाख (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते.