लघवीसाठी हायवेवर थांबला, टँकरखाली पाय गेला; भांडुपच्या तरुणाला 2 कोटींची भरपाई

Mumbai Man Road Accident: अपघातग्रस्त व्यक्तीने न्यायालयाचे दार ठोठावले. अपघातग्रस्त आणि आरोपी दोघांकडून कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

Updated: Nov 14, 2023, 05:06 PM IST
लघवीसाठी हायवेवर थांबला, टँकरखाली पाय गेला; भांडुपच्या तरुणाला 2 कोटींची भरपाई title=

Mumbai Man Road Accident News: अपघातग्रस्त झालेल्या नागरिकांना भरघोस भरपाई देऊन न्याय दिल्याच्या घटना विदेशात घडल्याचे आपण ऐकले असेल. पण भारतातही अशी भरपाई दिली गेल्याचे ऐकलात तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण मुंबईतील मोटार अपघात न्यायाधिकरणाने आपल्या निर्णयात दुर्घटनाग्रस्ताला तब्बल 2 कोटी रुपये देण्याचा निर्णय दिला आहे. काय आहे हे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. भांडुप येथील एक व्यक्ती राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभे राहून लघवी करत होता. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने त्यांना धडक दिली. या अपघातात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांचा एक पाय कापावा लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचा पाय कापण्यात आला.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही. अपघातग्रस्त व्यक्तीने न्यायालयाचे दार ठोठावले. अपघातग्रस्त आणि आरोपी दोघांकडून कोर्टासमोर जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आरोपीच्या बाजूचा युक्तिवाद कोर्टासमोर तग धरु शकला नाही. टँकर चालकाची चूक आहे आणि अपघातग्रस्ताच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करणे सोपे नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालय किंवा आरोपी दोघेही त्या व्यक्तीचे पाय परत करू शकत नाहीत. त्याचे नुकसान काही भरपाई देऊन कमी केले जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले. अपघातग्रस्ताचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही हे खरे आहे. पण त्याच्या कमाई क्षमतेवर परिणाम झाला हेही सत्य आहे. जर तो निरोगी असता तर त्याने आयुष्यभर चांगली कमाई केली असती. पण या अपघाताचा त्याच्यावर परिणाम झाला.

लघवी करताना अपघात

अपघातग्रस्त तरुण एफएमसीजी कंपनीत डीजेएम म्हणून कार्यरत आहे. ते आपल्या मित्रासोबत मध्य प्रदेशातील दतिया येथे जात होते. दरम्यान एका ढाब्याजवळ लघवी करण्यासाठी ते थांबले. त्यावेळी चुकीच्या दिशेने येणाऱ्या टँकरने त्यांना धडक दिल जखमी झाले. पीडितेचे म्हणणे आहे की जेव्हा माझा अपघात झाला, तेव्हा नक्की काय सुरु आहे, हे मला कळत नव्हते असे ते म्हणाले. दरम्यान डॉक्टरांनी पाय कापायला सांगितल्यावर डोळ्यासमोर अंधार पसरला. पुढे काय होणार हे समजत नव्हते पण कोर्टाचा एक निर्णय हृदयाला भिडला असेल ते म्हणाले. 

अपघातग्रस्ताबद्दल त्याच्या कंपनीने सहानुभूती दाखवली ही चांगली गोष्ट असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. जर त्यांनी हे केले नसते तर अपघातग्रस्ताला कोणत्या प्रकारचा त्रास सहन करावा लागला असता? याबद्दल फक्त अंदाज लावता येऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले.