रविवारी घराबाहेर पडताय? जाणून घ्या मेगा ब्लॉक संदर्भातील महत्वाची अपडेट

Mumbai MegaBlock: अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय सेवेवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Apr 26, 2024, 08:17 PM IST
रविवारी घराबाहेर पडताय?  जाणून घ्या मेगा ब्लॉक संदर्भातील महत्वाची अपडेट title=
Megablock Update

Mumbai MegaBlock: मध्य रेल्वे, मुंबई विभाग दिनांक 28 एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय सेवेवर मेगा ब्लॉक घेत आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.43  ते दुपारी 3.44 वाजेपर्यंत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीमी/सेमी जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली स्थानकावर थांबतील आणि वेळापत्रकानुसार 10 मिनिटे उशिराने पोहोचतील. सकाळी 10.36 ते दुपारी 3.51 पर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप धिम्या/सेमी जलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील, पुढे डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर थांबतील. मुलुंड स्टेशनला वेळापत्रकाच्या 10 मिनिटे उशिराने पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11 ते सायंकाळी 5 या दरम्यान सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या सेवा नियोजित वेळेपासून 10 मिनिटे उशिराने पोहोचतील/जातील.ठाणे लोकल गाड्या अप डाऊन धीम्या मार्गावर धावणार आहेत. डाऊन धीम्या लाईनवर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.53 वाजता टिटवाळ्यासाठी सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल, बदलापूरसाठी विशेष लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 3.5 वाजता सुटणार आहे.  अप धीम्या मार्गावर ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी सकाळी 10.25 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी 4.17 वाजता कल्याण येथून परळसाठी सुटेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 पर्यंत सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगावसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 पर्यंत सुटणारी सेवा डाऊन हार्बर मार्गावरील सेवा कायम राहील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत आणि गोरेगाव/वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत बंद राहतील. डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.4 वाजता सुटेल. गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.22 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 4.51 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 4.56 वाजता सुटेल.

अप हार्बर मार्गावर: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 9.40 वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी 10.20 वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी 3.28 वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी 4.58 वाजता सुटेल. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या कालावधीत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.