नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडिया आता मेट्रोने जोडणार, दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय

Mumbai Metro: मुंबई शहरात मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. मेट्रो 11 मार्गिकेचा आराखड्यात बदल करण्यात येत आहे. कसा असेल आता मार्ग जाणून घ्या.

मानसी क्षीरसागर | Updated: May 6, 2024, 03:35 PM IST
नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडिया आता मेट्रोने जोडणार, दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय title=
south bombay nagpada crawford market and gateway of india will be connected by metro 11

Mumbai Metro:  मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने वडाळा-सीएसएमटी भुयारी मेट्रो 11 मार्गिकेच्या आराखड्यात बदल करण्यात येणार आहे. जूनपर्यंत या मार्गिकेचा नवीन आराखडा तयार केला जाणार आहे. या परिसरात होणारी ट्रॅफिकची समस्या लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन मेट्रो 11च्या मार्गिकेत बदल करत आहेत. त्यासाठी नवीन डीपीआर तयार करण्यात येत आहे. मेट्रो 11च्या नवीन मार्गिकेत नागपाडा, भेंडी बाजार, कॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडियाला मेट्रो कनेक्ट करण्याचा प्लान तयार करण्यात येत आहे. एमएमआरसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील महिन्यात तयार होणार आहे. 

वाहतूक कोंडी मोठी समस्या

मेट्रो 11च्या निर्माणाची जबाबदारी पहिले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे होती. एमएमआरडीएने सीएसएमटी ते वडाळादरम्यान मेट्रो 11चा मार्ग ठरवला होता. मात्र या मेट्रो मार्गिकेचा 70 टक्के मार्ग अंडरग्राउंड असल्यामुळं या मार्गिकेची जबाबदारी एमएमआरसीकडे सोपवण्यात आली. मेट्रोच्या या मार्गिकेचा पहिला आराखडा एमएमआरडीने तयार केला होता. 

मात्र, एमएमआरडीने तयार केलेल्या डीपीआरमध्ये गेट वे ऑफ इंडिया, भायखळा, नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट या जागा मेट्रोला कनेक्ट केल्या नव्हत्या. या भागात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. एमएमआरडीएने ही मार्गिका प्रवासी संख्येच्या दृष्टीने व्यवहार्य ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळं एमएमआरसी’ने या मार्गिकेचा नव्याने आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 

मेट्रोमुळं होणार फायदा

मुंबईत येणारा प्रत्येक व्यक्ती एकदातरी गेटवे ऑफ इंडिया येथे फिरण्यासाठी आणि क्रॉफर्ड मार्केटमध्ये शॉपिंगसाठी जातोच जातो. सध्या येथे जाण्यासाठी लोक सीएसएमटी रेल्वे स्थानकात उतरून रस्ते मार्गे किंवा चालत क्रॉफर्ड मार्केट व गेट वे ऑफ इंडियाला जातात. अशातच हे सगळे परिसर मेट्रोने कनेक्ट झाल्यास प्रवाशांचा प्रवास सोप्पा होणार आहे. तसंच, सीएसएमटीवर मेट्रो 3 कॉरिडॉरचेदेखील स्थानक तयार होत आहे. त्यामुळं लोक मेट्रो किंवा रेल्वेने आरामात त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचू शकणार आहेत. 

दरम्यान, दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन 15 जूनपर्यंत नवीन आराखडा एमएमआरसीला सादर करणार आहेत. त्यानंतरच ही मार्गिका नेमकी कशी असेल हे स्पष्ट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो मार्ग 11 हा मेट्रो 4 ए आणि मेट्रो 4 (कासारवडवली - घाटकोपर - वडाळा) चा विस्तार असेल.