मारूतीने लॉन्च केली ४.९९ लाखात नवी कार बलेनो हॅचबॅक

 हॅचबॅक म्हणजे बिना डिक्कीची गाडी.. या कारच्या श्रेणीत आपला अग्रक्रम बनिवण्यासाठी मारुती सुझुकी इंडियाने आज बाजारात बलेनो हॅचबॅक लॉन्च केली आहे. दिल्लीत याच्या विविध व्हर्जनमध्ये त्यांची किंमत ४.९९ लाख ते ८.११ पर्यंत आहे. 

Updated: Oct 26, 2015, 09:54 PM IST
मारूतीने लॉन्च केली ४.९९ लाखात नवी कार बलेनो हॅचबॅक  title=

मुंबई :  हॅचबॅक म्हणजे बिना डिक्कीची गाडी.. या कारच्या श्रेणीत आपला अग्रक्रम बनिवण्यासाठी मारुती सुझुकी इंडियाने आज बाजारात बलेनो हॅचबॅक लॉन्च केली आहे. दिल्लीत याच्या विविध व्हर्जनमध्ये त्यांची किंमत ४.९९ लाख ते ८.११ पर्यंत आहे. 

ही कार कंपनीच्या मानेसर या हरियाणातील प्लान्टमध्ये तयार करण्यात आली आहे. या मॉडेलच्या विकासासाठी १०६० कोटी रूपये खर्च करण्यात आले आहे. यात मनोरंजनासाठी अॅपलचा कारप्ले लावण्यात आले आहे. अॅपलची सिस्टिम असलेली हे देशातील पहिली कार आहे. 

पेट्रोलवर बलेनोची अॅव्हरेज २१.४ किलोमीटर प्रति लीटर आहे. तर डिझेल व्हर्जनसाठी याची अॅव्हरेज २७.३९ किलोमीटर प्रतिलीटर सांगण्यात आला आहे. पेट्रोल व्हर्जन ४.९९ ते ७.०१ लाख रूपये आहे. तर डिझेलची किंमत ६.१६ लाख ते ८.११ लाख रूपये आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.