...या २५ शहरांत केवळ २५०० रुपयांत विमानप्रवास!

कॅबिनेटनं नव्या विमानचालन धोरणाला (एव्हिएशन पॉलिसी)ला मंजुरी दिलीय. या पॉलिसीनुसार, प्रवाशांना एका तासांच्या विमानप्रवासासाठी २५०० रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागणार नाहीत. 

Updated: Jun 16, 2016, 03:57 PM IST
...या २५ शहरांत केवळ २५०० रुपयांत विमानप्रवास! title=

नवी दिल्ली : कॅबिनेटनं नव्या विमानचालन धोरणाला (एव्हिएशन पॉलिसी)ला मंजुरी दिलीय. या पॉलिसीनुसार, प्रवाशांना एका तासांच्या विमानप्रवासासाठी २५०० रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागणार नाहीत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या महत्त्वाच्या बैठकीत नव्या एव्हिएशन पॉलिसीला मंजुरी देण्यात आलीय. भारतातील २५ शहरं आणि १८ नियमित असे मार्ग आहेत जिथे जाण्यासाठी विमानप्रवासाचा वेळ एक तासांहून कमी आहे. म्हणजेच, या मार्गांवर तुम्हाला निश्चितच केवळ २५०० रुपयांमध्ये प्रवास करता येणार आहे. 

नव्या धोरणानुसार, यापुढे कोणत्याही प्रवाशानं आपलं तिकीट रद्द केल्यास त्यांच्याकडून २०० रुपयांपेक्षा जास्त चार्ज वसूल केला जाऊ शकणार नाही. तसंच १५ दिवसांच्या आत तुम्हाला रिफंड परत मिळेल. 

कोणत्या शहरांत तुम्ही २५०० रुपयांत प्रवास करू शकाल... 

मुंबई - पुणे

मुंबई - सूरत

मुंबई - गोवा

दिल्ली - जयपूर

दिल्ली - लखनऊ

दिल्ली - चंडीगड

दिल्ली - देहरादून

दिल्ली - शिमला

कोलकाता - रांची

कोलकाता - भुवनेश्वर

हैदराबाद - विजयवाडा

हैदराबाद - तिरुपती

बेंगळुरू - कोईम्बतूर

बेंगळुरू - कोच्ची

दीव - पोरबंदर

कोच्ची - त्रिवेंद्रम

चेन्नई - बेंगलुरू

इंदौर - नागपूर