फिल्म रिव्ह्यू : रितेश देशमुखचा बँगिस्तान, हास्याच्या कारंज्यात गंभीर विषयाला हात

बँगिस्तान...या विकेण्डला फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी या जोडीने प्रोड्युसर म्हणून कॉमेडी टच असलेली एक मसालेदार फिल्म तुमच्या भेटीला आणलीये.

Updated: Aug 7, 2015, 05:53 PM IST
फिल्म रिव्ह्यू : रितेश देशमुखचा बँगिस्तान, हास्याच्या कारंज्यात गंभीर विषयाला हात title=

जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई : बँगिस्तान...या विकेण्डला फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी या जोडीने प्रोड्युसर म्हणून कॉमेडी टच असलेली एक मसालेदार फिल्म तुमच्या भेटीला आणलीये.

काय आहे चित्रपटाची कथा

फिल्मचा सब्जेक्ट जरी हिंदू-मुस्लिमांमधील तेढ, दहशतवाद, सुसाईड बॉम्बर असा असला तरी विनोदाची चमचमीत फोडणी असणारा हा सब्जेक्ट आहे. रितेश देशमुख पुलकित सम्राट आणि जॅकलीन फर्नांडीस हे त्रिकूट यात धमाल आणतंय. फिल्मची कथा सांगायची झाली तर दोन कट्टर तरुणांची ही कथा आहे.

जे सुसाईड बॉम्बर म्हणून काहीतरी हटके करण्याच्या प्रयत्नात एका वेगळ्यात दुनियेत प्रवेश करतात आणि अलगदपणे अडकत जातात. हाफिज बिन अली हा कॉल सेंटरमध्ये काम करणारा तरुण रितेशने जबरदस्त रंगवलाय. तर पुलकित सम्राट एक कट्टर हिंदुत्ववादी युवक आहे. जो एक कलाकार म्हणून नाटकांमधून रामभक्त हनुमानाच्या रोलमध्ये स्वतःला झोकून देत असतो. विश्व धार्मिक कॉन्फरन्ससाठी दोघे पोलंडमध्ये दाखल होतात आणि सुरू होते एक वेगळीच गडबड...

कसा केला अभिनय

रितेश देशमुख आणि पुलकित सम्राट या दोघांनीही यात धमाल आणलीये. विशेषतः  डायलॉग डिलिव्हरी करताना रितेशचा स्क्रीनवरचा वावर जास्त भाव खावून जातो. कट्टर हिंदू आणि कट्टर मुस्लिम लीडर्स यांच्यातलं शाब्दिक युद्धही रंगतदार आहे. जॅकलीन फर्नांडीस फिल्ममध्ये आहे, मात्र  काही डायलॉग आणि गाण्यांपुरतंच तिला मर्यादित ठेवण्यात आलंय.

कसं झालं दिग्दर्शन

करण अंशुमान हा आणखी एक डिरेक्टर बँगिस्तानच्या रुपानं बॉलिवूडला मिळालाय. फिल्मची स्टोरी फारशी वेगळी नसली तरी मसालेदार डायलॉग घालून सिनेमा कॉमेडीकडे जास्त झुकवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. डेब्यू डिरेक्टर म्हणून अंशुमानचा हा प्रयत्न बरा असला तरी सिनेमा आणखी रंगवता आला असता हेही तितकच खरं. सिनेमातली लोकेशन्स चांगली आहेत. उत्तम कॅमेरावर्कमुळे ती पडद्यावर दिसतातही छान. मात्र लोकेशन्सच्या प्रेमात पडत कलाकारांकडून प्रेक्षकांना अपिल होईल अथवा हवा तो अभिनय करून घेण्यात  डिरेक्टर कमी पडल्याचं नक्कीच जाणवतं. त्यामुळे काही डायलॉग हे प्रेक्षकांना कंटाळवाणे वाटतात. या सगळ्यामुळे सिनेमाची कथा कधीकधी उगाच कुठेतरी भरकटत चाललीये असंही वाटून जातं.

कशी आहेत चित्रपटातील गाणी

फिल्ममध्ये वेगवेगळी गाणी आहेत. मात्र सगळा मसालाच वाटतो.  त्यातल्या त्यात सॅटर्डे नाईट या नव्या यंग सिंगर्सनी गायलेलं गाणं ताल धरायला लावतं. यंग ऑडियन्ससाठी ही एक ट्रिट होऊ शकते.

एकूण कसा आहे चित्रपट

ओव्हरऑल ऑडियन्स सध्या कॉमेडी फिल्मना जास्त पसंती देतो असं असली तरी ही कॉमेडी प्रेक्षकांना भावली पाहिजे हेही तितकच खरं. यात काही गडबड झाली तर मात्र फिल्म फसते. बँगिस्तान काही प्रमाणात अशी फसलेली फिल्म आहे. मात्र रितेशची फ्री हॅण्ड कॉमेडी फिल्मला थोडी तारून नेते. सिनेमाचा ऑल ओव्हर लूक बघता मी या सिनेमाला देते अडीच स्टार्स 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.