अभिनेता पुलकित सम्राटने कंटाळून ट्विटर अकाऊंट केलं बंद

बॉलिवूड अॅक्टर पुलकित सम्राटने त्याच्या वैयक्तीक आयुष्याशी संबंधित चर्चांवर नाराजी दर्शवली आहे. त्यानंतर त्याने त्याचं ट्विटर अकाउंट बंद केलं आहे. पुलकित त्याची पत्नी श्वेता रोहिराशी वेगळी झाल्यानंतर आणि अभिनेत्री यामी गौतमसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. या चर्चांना कंटाळून त्याने त्याचं अकाऊंट बंद केलं आहे.

Updated: Sep 5, 2016, 03:24 PM IST
अभिनेता पुलकित सम्राटने कंटाळून ट्विटर अकाऊंट केलं बंद title=

मुंबई : बॉलिवूड अॅक्टर पुलकित सम्राटने त्याच्या वैयक्तीक आयुष्याशी संबंधित चर्चांवर नाराजी दर्शवली आहे. त्यानंतर त्याने त्याचं ट्विटर अकाउंट बंद केलं आहे. पुलकित त्याची पत्नी श्वेता रोहिराशी वेगळी झाल्यानंतर आणि अभिनेत्री यामी गौतमसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. या चर्चांना कंटाळून त्याने त्याचं अकाऊंट बंद केलं आहे.

पुलकित म्हणतो की, 'मला काही फरक पडत नाही. ज्या दिवशी आपण यावर लक्ष देणं बंद करु त्या दिवशी आपण आणखी मजबूत बनू नाही तर आपण कमजोर दिसू. आता आणखी ट्विट नाही.'

शेवटच्या ट्विटमध्ये अभिनेता पुलकित म्हटलं आहे की, 'तुमचं प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद. ही आभासी दुनिया चांगली आहे पण इतकीही चांगली नाही.'