व्हॉट्सअॅपने सोडवला दूषित पाण्याचा प्रश्न!

शिवडीमधल्या नागरिकांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करत दुषित पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवलाय. व्हॉटसअपवर फोटो टाकताच लगेचच दुषित पाण्याचा प्रश्न सुटला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 8, 2013, 06:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवडीमधल्या नागरिकांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करत दुषित पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवलाय. व्हॉट्सअॅपवर फोटो टाकताच लगेचच दुषित पाण्याचा प्रश्न सुटला.
शिवडी मधल्या या बी.डी.डी.चाळींमध्ये पंधरा दिवसांपासून गढूळ पाणी येतंय. या दुषित पाणीपुरवठ्याबद्दल नागरिकांनी महापालिकेकडे अनेक तक्रारी केल्या. पण कुणीही दाद देत नव्हतं. दुषित पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी इथल्या नागरिकांनी चांगली शक्कल लढवली. नागरिकांनी दूषित पाण्याचे फोटो व्हॉट्सअॅपवरून महापालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांना पाठवले. हे फोटो पाहुन अधिका-यांना दूषित पाणीपुरवठ्याची तीव्रता कळली आणि यंत्रणा तातडीनं कामाला लागली. काही तासांतच शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला.
फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा योग्य वापर झाला, तर महत्त्वाचे प्रश्न सहज सोडवता येतात, याचंच हे उदाहरण.... त्यातून इतरांनीही प्रेरणा घ्यायला हरकत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.