प्रतिक्षा संपली...मारूती सुझुकीची गिअरलेस कार

अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली आहे. मारुती-सुझुकीने मार्केटमध्ये नवी कार आणली आहे. ही कार गिअरवर नसणार आहे. त्यामुळे धमाल येणार आहे. देशातील पहिली गिअरलेस कार बनविण्याचा मान मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने पटकावला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 6, 2014, 10:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली आहे. मारुती-सुझुकीने मार्केटमध्ये नवी कार आणली आहे. ही कार गिअरवर नसणार आहे. त्यामुळे धमाल येणार आहे. देशातील पहिली गिअरलेस कार बनविण्याचा मान मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने पटकावला आहे.
कंपनीने पहिली गियरलेस कार सलेरियो बाजारात उतरविली आहे. नवी दिल्लीत भरविण्यात आलेल्या १२व्या अॅटो एक्स्पोमध्ये ही कार ठेवण्यात आली होती. या कारची किंमत ४.२९ लाख ते ४.५९ रूपयांपर्यंत आहे. या कारची सुरूवातीची किंमत ३.९० लाखांच्या घरात आहे.
गेल्या एक महिन्यापासून मारूती-सुझुकी कंपनी जाहिरातीच्या माध्यमातून या गाडीचा प्रसार करीत होती. मात्र, या कारचा लूक आणि किंमत लपविली होती.
सलेरियो ही कार पाहिल्यावर टोयोटाची इटियोस लिवा कार डोळ्यासमोर येते. मात्र, सलेरियो ही कार गिअरलेस असणार आहे. त्यामुळे आता भारतात गिअरलेस कारची धूम वाढले. २०२० पर्यंत या कारचे ३० टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढविण्याचा विचार मारुती-सुझुकी कंपनीने केला आहे. ही कार तयार करण्यासाठी कंपनीला तब्बल चार वर्षे लागली आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा>