'कभी तो नजर मिलाओ...' अभिनेत्री कुठे झाली गायब? भीतीपोटी नाकारलेली यश चोप्राची ऑफर

Aditi Govitrikar Birthday: तुम्हाला अदनान सामीचं 'कभी तो नजर मिलाओ...' हे गाणं आठवत का? त्यात दिसलेली अभिनेत्री आज कुठून गायब झाली तुम्हाला माहितीय का?

May 21, 2024, 10:53 AM IST
1/9

90 च्या दशकात अदनान सामी आणि आशा भोसले यांच्या आवाजातील 'कभी तो नजर मिलाओ...'  हे खूप गाजलं होतं. हा एक म्युझिक अल्बम होता. त्यातील अभिनेत्रीला यश चोप्राची ऑफर मिळाली होती पण तिने त्या भीतीपोटी नकार दिला. 

2/9

आम्ही बोलत आहोत अव्यावसायिक डॉक्टर आणि मिसेस वर्ल्ड अदिती गोवित्रीकर हिच्याबद्दल. आज ती 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

3/9

महाराष्ट्रातील पनवेलमधील मराठी हिंदू कुटुंबात तिचा जन्म झाला होता. स्त्रीरोगशास्त्रात एमएसची पदवी घेतली. अभ्यासासोबत ती मॉडेलिंगही करायची. 

4/9

अदितीने ग्लॅडरॅग्स मेगामॉडेल स्पर्धेत मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर 'पॉन्ड्स' सारख्या मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीत ती झळकली. हृतिक रोशनसोबत पेप्सीच्या जाहिरातीतही दिसली 

5/9

2001 मध्ये अदिती गोवित्रीकरने मिसेस वर्ल्डचा किताब पटकावला. त्यानंतर तिला बॉलिवूडमधून ऑफर यायला लागली.  मिलिंद सोमणसोबतच्या '16 डिसेंबर' तिची लोकप्रियता प्रचंड वाढली. तिने साऊथ इंडस्ट्रीमध्येही काम केलंय. 

6/9

यश चोप्रा यांनी तिला अनेक वेळा चित्रपटाची ऑफर दिली, पण तिने ती नाकारली. कारण ती कास्टिंग काउचमुळे निराश होती. 

7/9

वैद्यकीय अभ्यासादरम्यान त्यांची भेट मुज्जफजल लोखंडवालासोबत झाली. त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. घरच्यांच्या विरोधानंतरही 7 वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी 1998 मध्ये विवाह केला. 

8/9

पण लग्नांतर धर्मामुळे संसार अडचणी येऊ लागल्या. नवरा मारायचा म्हणून तिने 10 वर्षांनंतर घटस्फोट घेतला. तिला दोन मुलं आहे ज्यांना ती एकटीने वाढवते. 

9/9

अदिती 'बिग बॉस सीजन 3' आणि 'खतरों के खिलाडी' मध्ये दिसली होती. आज अदिती तिच्या मेडिकल आणि मॉडेलिंग प्रोफेशनशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर बनवते.