चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच 'पुष्पा' ने मानधनात केली मोठी वाढ, एका चित्रपटासाठी किती घेणार अल्लु अर्जुन?

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन हा त्याचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2: द रूल' मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. त्यात अशी माहिती समोर येत आहे की चित्रपटानं प्रदर्शनाच्या आधीच 1200 कोटींची कमाई केली आहे. त्यात आता अशी माहिती समोर येत आहे की अल्लू अर्जुननं त्याच्या मानधनात मोठी वाढ केली आहे. 

| Apr 26, 2024, 18:55 PM IST
1/7

अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुन हा लोकप्रिय दाक्षिणात्य कलाकारांपैकी एक असून लवकरच 'पुष्पा 2: द रूल' मध्ये दिसणार आहे. 

2/7

या दिवशी होणार प्रदर्शित

15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानं प्रदर्शना आधी 1200 कोटींची कमाई केली आहे. 

3/7

अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुननं त्याच्या मानधनात जवळपास 30 टक्के वाढ केल्याचे म्हटले जात आहे. रिपोर्टनुसार, आतापर्यंत तो 100 कोटी रुपये मानधन घ्यायचा. आता त्याच्या मानधनात वाढ झाली आहे. 

4/7

इतकी झाली वाढ

आता त्याच्या मानधनात वाढ झाली असून 150 कोटी केली आहे. 

5/7

हिंदी डबचं थिएटर राईट्स

'पुष्‍पा 2' च्या हिंदी डब व्हर्जननं 200 कोटी रुपयांची डील मिळाल्याचं म्हटलं जातं आहे. 

6/7

दक्षिण भारतात इतक्या कोटींची डील

दक्षिण भारतात डिस्ट्रीब्यूशनसाठी 270 कोटींसाठी थिएटर राइट्स मिळाले आहेत. 

7/7

स्ट्रिमिंग राईट्स

चित्रपटाचे स्ट्रिमिंग राईट्स हे 275 कोटींना नेटफ्लिक्सनं विकत घेतल्याचे म्हटले जाते. तर सॅटेलाइट राइट्समध्ये 450 कोटींच्या रुपयांची कमाई केली.