Akshaya Tritiya 2024 Gold Muhurta : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त

Akshaya Tritiya Muhurta : अक्षय्य तृतीया आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. 10 मे रोजी शुक्रवारी अनेकजण सोनं खरेदी करतात. या पवित्र दिवशी सोन्याची खरेदी शुभ मुहूर्तावर करा. 

| May 10, 2024, 08:15 AM IST

Akshaya Tritiya 2024 Date : दरवर्षी वैशाख माह शुक्ल पक्षच्या तृतीया तिथीला अक्षय्य तृतिया हा सण साजरा केला जातो. यंदा 10 मे रोजी शुक्रवारी 'अक्षय्य तृतीया' हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवशी मंगल कार्य केले जातात त्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही. पण सोने खरेदीसाठी मुहूर्त महत्त्वाचे असतात. कारण या मुहूर्ताला खरेदी केलेले सोने त्या व्यक्तीला लाभदायी ठरते. 

1/7

ज्योतिषशास्त्रानुसार

Akshaya Tritiya 2024

नारायण-लक्ष्मीची अक्षय्य तृतीयेला आराधना केली जाते. तसेच नवीन वस्तू, सोने खरेदी केले जातात. तसेच या दिवशी खरेदी केलेली प्रत्येक गोष्ट अक्षय्य ठरते म्हणजे लाभदायी ठरते. खासकरुन या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी हा शुभ मानला जातो. सोने खरेदीबाबत ज्योतिषशास्त्र काय सांगते ते समजून घेऊया.

2/7

सोन्याचे ज्योतिष शास्त्रात महत्त्व

Akshaya Tritiya 2024

सोने हे पृथ्वीवर मिळणाऱ्या सर्व मौल्यवान धातुंपैकी एक आहे. सोने समृद्धि आणि संपन्नतेचे प्रतिक आहे. ज्योतिष शास्त्रात सोन्याला अनेक ग्रहांशी जोडले गेले आहे. पण याचा संबंध देवगुरु बृहस्पतीशी जोडले गेलेले आहे. सोने जर लाभदायक असेल तर त्या व्यक्तीची समृद्धी होईल यात शंकाच नाही. यामुळेच सोने खरेदी करण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस महत्त्वाचा आहे. 

3/7

सोने खरेदी कसे कराल?

Akshaya Tritiya 2024

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्यासाठी दुपारची वेळ ही अतिशय लाभदायी आहे. जर तुम्ही या दिवशी सोने खरेदी करत नसाल तर त्याच्याशी संबंधित इतर गोष्टी करा. जसे की, दान करण्यासाठी कोणतेतरी धातू खरेदी करला. तसेच सोने खरेदी करुन ते पूजेत ठेवले जाते.   

4/7

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचा विशेष प्रयोग

Akshaya Tritiya 2024

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचा एक तुकडा किंवा क्वाईन खरेदी करा. अक्षय्या तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी केल्यावर ते लक्ष्मीला अर्पण केले जाते. सोनं खरेदी करून ते लाल कपड्यात गुंडाळून त्याची पूजा करा.   

5/7

सोने खरेदीचे शुभ मुहूर्त

Akshaya Tritiya 2024

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी चार शुभ मुहूर्त आहेत पहिला मुहूर्त सकाळी 5.33 ते सकाळी 10.37 पर्यंत  दुसरा मुहूर्त दुपारी 12.18 ते दुपारी 1.59 पर्यंत  तिसरा मुहूर्त संध्याकाळी 5.21 ते संध्याकाळी 7.02 पर्यंत  चौथा मुहूर्त रात्री 9.40 ते रात्री 10.59 पर्यंत

6/7

पूजाविधी

Akshaya Tritiya 2024

अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून पूजा करावी  सर्वात अगोदर स्नान करुन पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करावे  भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते  धूप-दिवा आणि नैवेद्य अर्पण केले जाते  विष्णु चालीसेचे पठण करावे  दिवसाच्या शेवटी देखील विष्णु आणि लक्ष्मी यांची आराधना करावी. तसेच या दिवशी सोने खरेदी केली जाते आणि दान केले जाते. 

7/7

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय कराल?

Akshaya Tritiya 2024

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केलेच जाते. पण यासोबतच घर खरेदी करणे, गृह प्रवेश करणे तसेच कार खरेदी केली जाते. अनेकजण या दिवसाची वाट पाहतात. अक्षय्य तृतीया साडे तीन मुहूर्तांपैंकी एक आहे. त्यामुळे मुहूर्त न पाहता शुभ कार्य केले जाते.