Sanju Samson Fined: अंपायरशी वाद घालणं संजूला पडलं महागात; BCCI ने केली मोठी कारवाई

Sanju Samson Fined: आयपीएलमध्ये मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. यावेळी संजू सॅमसनच्या एका कृत्याने वाद निर्माण झाला असून त्यावर बीसीसीआयने कठोर कारवाई केली आहे.

| May 08, 2024, 11:27 AM IST
1/7

आयपीएल 2024 मध्ये बीसीसीआयने राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनवर मोठी कारवाई केलीये. 

2/7

या सामन्यात संजूची विकेट गेल्यानंतर संजूने अंपायरशी वाद घातला होता. संजूच्या या कृत्यावर बीसीसीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

3/7

16व्या षटकात मुकेश कुमारच्या चेंडूवर संजू कॅच आऊट झाला. 

4/7

होपने घेतलेला कॅच पाहता त्याचा पाय बाऊंड्री लाईनला पाय लागल्याचं दिसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. यावरून संजू थेट अंपायरशी भिडला. 

5/7

यावेळी बीसीसीआयने अंपायरच्या निर्णयाशी असहमती दाखवल्याबद्दल संजू सॅमसनवर मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावला आहे.

6/7

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यादरम्यान आयपीएल आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आलाय.

7/7

आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.8 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा केला असून संजूने गुन्हा कबूल केलाय.