योनीमार्गात 'हे' बदल दिसले तर सावध व्हा; Vaginal Cancer ची लक्षणं काय आहेत?

ICMR च्या अहवालानुसार, भारतात पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. त्याचवेळी, गेल्या काही वर्षांत महिलांमध्ये योनीमार्गाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्येही वाढ झालीये.

| Apr 27, 2024, 10:12 AM IST
1/7

आयसीएमआरच्या रिपोर्टनुसार, वजायनल कॅन्सर हा दुर्मिळ आहे. तो खूप गंभीर असू शकतो. 

2/7

योनीमार्गाच्या कर्करोगाच्या काही सामान्य आणि सुरुवातीच्या लक्षणांबद्दल आज माहिती घेऊया. ही लक्षणे वेळीच ओळखून आणि योग्य उपचारांच्या मदतीने ही स्थिती गंभीर होण्यापासून रोखता येते.

3/7

जर तुम्हाला मासिक पाळीच्या व्यतिरिक्त योनिमार्गातून रक्तस्त्राव होत असेल तर एकदा नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

4/7

योनीतून जर स्त्राव सामान्यपेक्षा जास्त असेल किंवा स्त्रावबरोबर रक्तस्त्राव होत असेल तर हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं

5/7

लैंगिक संबंधांच्या वेळी खूप वेदना जाणवणं हे देखील योनिमार्गाच्या कर्करोगाचे लक्षणं असू शकते.   

6/7

योनीमार्गात कोणत्याही प्रकारची गाठ जाणवणं हे योनीमार्गाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

7/7

या सर्वांशिवाय लघवी करताना वेदना किंवा स्टूलमध्ये रक्त येणं ही देखील योनिमार्गाच्या कर्करोगाची लक्षणं मानलं जातं.