7.99 लाखांच्या SUV ने लावलंय वेड! 400000 गाड्यांची धडाक्यात विक्री; फिचर्सही दमदार आणि जबरदस्त

दक्षिण कोरियन कार कंपनी KIA ने भारतीय बाजारपेठेत आपली प्रसिद्ध एसयुव्ही Kia Sonet च्या नव्या फेसलिफ्ट मॉडेलला लाँच केलं होतं. दरम्यान कंपनीने फक्त 44 महिन्यात 4 लाख युनिट्सची विक्री झाल्याची माहिती दिली आहे.   

Apr 26, 2024, 18:28 PM IST

दक्षिण कोरियन कार कंपनी KIA ने भारतीय बाजारपेठेत आपली प्रसिद्ध एसयुव्ही Kia Sonet च्या नव्या फेसलिफ्ट मॉडेलला लाँच केलं होतं. दरम्यान कंपनीने फक्त 44 महिन्यात 4 लाख युनिट्सची विक्री झाल्याची माहिती दिली आहे. 

1/10

भारतीय बाजारपेठेत गेल्या काही वर्षांपासून कमी किंमत आणि दमदार फिचर्स यामुळे SUV ला मागणी वाढली आहे.   

2/10

दक्षिण कोरियन कार कंपनी KIA ने भारतीय बाजारपेठेत आपली प्रसिद्ध एसयुव्ही Kia Sonet च्या नव्या फेसलिफ्ट मॉडेलला लाँच केलं होतं.   

3/10

दरम्यान कंपनीने फक्त 44 महिन्यात 4 लाख युनिट्सची विक्री झाल्याची माहिती दिली आहे.   

4/10

भारतीय बाजारपेठेबद्दल बोलायचं गेल्यास 7.99 लाख किंमतीच्या एसयुव्हीच्या 3 लाख 17 हजार 154 युनिट्सची विक्री झाली आहे. याशिवाय 85 हजार 814 युनिट्स एक्स्पोर्ट करण्यात आले आहेत.   

5/10

Kia Sonet ची निर्मिती आंध्र प्रदेशमधील किआच्या प्लांटमध्ये केली जाते. सप्टेंबर 2020 मध्ये कंपनीने एसयुव्हीला पहिल्यांदा भारतीय बाजारपेठेत लाँच केलं होतं.   

6/10

Seltos आणि Carnival सह दक्षिण कोरियन कंपनीकडून भारतात लाँच करण्यात आलेलं हे तिसरं मॉडेल आहे.   

7/10

Kia Sonet भारतीय बाजारपेठेत एकूण 9 ट्रिम्समध्ये येते. ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही पर्यायात उपलब्ध आहे.   

8/10

पेट्रोल व्हेरियंटमध्ये दोन इंजिन पर्याय मिळतात. तर डिझेलमध्ये 1.5 लीटर इंजिनचा पर्याय मिळतो.   

9/10

यामध्ये 10.25 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 4 वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, कनेक्टेड कार टेक आणि सनरुफ असे फिचर्स मिळतात.   

10/10

सुरक्षेसाठी यामध्ये 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सॉर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि 360 डिग्री कॅमेरा आहे.