PHOTO: खूप दिवस होऊनही होळीचा रंग जात नाही, मग करा 'हे' घरगुती सोपे उपाय

Post Holi Skin Care Tips: नुकताच धुळवडीचा सण होऊन गेला आहे. बाजारातील रंगांमुळे त्वचेला आणि केसांना कोरडेरपणा आलेला असतो. आपली त्वचा आणि केस अतिशय संवेदनशील असल्याने केमिकलचा परिणाम लगेच दिसून येतो. त्यामुळे या रंगांचा झालेला दुष्परिणाम कमी करण्याकरीता उपाय जाणून घेऊयात.

Mar 29, 2024, 12:09 PM IST
1/7

संवेदनशील त्वचेची काळजी

रंग खेळल्या नंतर शक्यतो लगेचच चेहऱ्यावरील रंग काढून टाकावा. रंग ओला असतानाच चेहरा धुतला तर रंग लगेचच जातो मात्र चेहऱ्यावर रंग सुकला तर त्याला काढणं अवघड होतं.   

2/7

जोरजोरात स्क्रब करणं टाळावं

त्वचेवर लागलेला रंग काढताना बऱ्याच वेळेला जोरजोरात त्वचेवर साबण किंवा  स्क्रबने रगडलं जातं. यामुळे त्वचेला जखम होण्याची शक्यता जास्त असते. आपली त्वचा ही अतिशय नाजूक असल्याने होळी खेळताना लागलेला रंग काढताना तो हळूवार काढावा. 

3/7

रंग काढण्याची सोपी पद्धत म्हणजे तेलाने मालिश केल्यास रंग लवकर निघण्यास मदत होईल. खूप दिवस होऊनही जर स्कीनवरचा रंग निघत नसेल तर तुम्ही घरगुती उपाय करु शकता.

4/7

 दही नॅचरल क्लिंजर म्हणून काम करतं.एका वाटीत दही आणि लिंबाचा रस एकत्र करून ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.   

5/7

डोळ्यांचे आरोग्य

होळीच्या रंगात असलेल्या केमिकलचा थेट परिणाम डोळ्यांवर ही होतो. डोळे जळजळणं, खाज येणं यासरखे डोळ्यांना अ‍ॅलर्जीचा त्रास होतो. रंग खेळून झाल्यावर काही दिवस डोळ्यांत गुलाब पाण्याचे थेंब टाकल्याने डोळ्यांना आराम मिळतो. गुलाब पाणी थंड असल्याने डोळ्यांचा दाह कमी होतो.   

6/7

केसांची काळजी कशी घ्याल?

केमिकलमुळे केस कोरडे पडतात. रंग केसांच्या मुळांपर्यंत गेल्याने त्यातील ओलावा नष्ट होतो. कोरड्या केसांना मऊ आणि मुलायम करण्याकरीता हेअर पॅकचा वापर फायदेशीर ठरतो. 

7/7

ऑलिव्ह ऑइल, मध आणि लिंबाचा रस एकत्रित करुन हा हेअर पॅक केसांना लावल्यावर केस अर्ध्या तासाने शॅम्पूने धुवावेत. याने केसांतील केमिकलचा परिणाम हळूहळू कमी होण्यास मदत होते.