दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटरच्या मुलीचं नाव 'इंडिया'? यामागची रोमांचक गोष्ट आणि क्रिकेटर्सच्या मुलांची इंटरेस्टिंग आणि युनिक नावं

क्रिकेटर्सबाबत चाहत्यांना खूप उत्सुकता असते. त्यांच्या खेळासोबत खासगी आयुष्याबद्दलही जाणून घ्यायचं असतं. अशावेळी एका परदेशी खेळाडून आपल्या मुलीचं ठेवलं 'इंडिया' हे नाव. या नावामागची गोष्ट अतिशय रोमांचक आहे. 

| Apr 20, 2024, 13:10 PM IST

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सने आपल्या मुलीचे नाव 'इंडिया जॉन्टी रोड्स' ठेवून भारताशी आयुष्यभराचे नाते निर्माण केले आहे. IPL-8 मध्ये मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा महान क्षेत्ररक्षक असलेला रोड्स चाहत्यांच्या बाबतीत टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंच्या बरोबरीने आला होता. एवढंच नव्हे तर आता त्यांच्या मुलीचे नाव ‘इंडिया’ ठेवून त्यांनी त्यांच्या भारताबद्दलचं प्रेम दर्शवलं आहे. 

1/7

इंडिया जॉन्टी रोड्स

Cricketers Baby Name And Meaning

रोड्स यांनी आपल्या मुलीचे नाव 'इंडिया' का ठेवले यामागचे रोमांचक अशी आठवण सांगितली आहे. रोड्स म्हणाले की, 'मी भारतात बराच काळ घालवला आहे. मला या देशाबद्दल सर्वात जास्त आवडते ते म्हणजे येथील समृद्ध संस्कृती, परंपरा आणि वारसा यांची विविधता. हा एक अध्यात्मिक देश आहे जो भविष्याचा विचार करतो. मला हे मिश्रण खरोखर आवडते. जीवनात चांगला समतोल राखला पाहिजे. एवढंच नव्हे तर ते पुढे म्हणतात की, 'भारत नावाने, माझ्या मुलीला जगातील सर्वोत्तम आणि एक प्रकारचा समतोल देखील मिळेल. यासोबतच आपण इतर भारतीय क्रिकेटर्सच्या मुलांची नावे आणि त्याचे अर्थ समजून घेणार आहोत. 

2/7

रोहित शर्मा

Cricketers Baby Name And Meaning

रोहित शर्माने आपल्या लेकीचं नाव 'समायरा' ठेवलं आहे. त्याचा अर्थ आहे परमेश्वराद्वारे संरक्षित, संरक्षक, जो देत राहतो. बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने देखील आपल्या लेकीला 'समायरा' हे नाव दिलं आहे. 

3/7

शिखर धवन

Cricketers Baby Name And Meaning

भारतीय क्रिकेट संघाचा शिखर धवन अतिशय लोकप्रिय खेळाडू आहे. शिखर धवनचा घटस्फोट झाला आहे. त्याने आपल्या लेकीला 'जोरावर' हे नाव दिलं आहे. या नावाचा अर्थ आहे ताकदवान. 

4/7

सुरेश रैना

Cricketers Baby Name And Meaning

सुरेश रैनाने आपल्या लेकीला दिलेलं नाव दोन अक्षरी आहे. 'सिया' हे नाव ग्रेसिया नावावरुन घेतलं आहे. आशिर्वाद, जाणीव असा याचा अर्थ आहे. 

5/7

महेंद्र सिंह धोनी

Cricketers Baby Name And Meaning

महेंद्र सिंह धोनी यांनी लेकीला 'जीवा' हे नाव दिलं आहे. जीवा या नावाचा अर्थ आहे एक रुप असा आहे. एक चमक, प्रतिभा, प्रकाश, ईश्वराचा प्रकाश असा या नावाचा अर्थ आहे. 

6/7

विराट कोहली

Cricketers Baby Name And Meaning

विराट कोहलीने आपल्या दोन्ही मुलांना अतिशय युनिक नाव ठेवलं आहे. मुलीचं नाव वामिका असं आहे. या नावाचा अर्थ आहे. देवी दुर्गा असं या नावाचा अर्थ आहे. तर मुलाचं नाव आहे 'अकाय'. अकाय हे नाव देखील अतिशय खास आहे. या नावाचा अर्थ आहे चमकणारा चंद्र, युनिटी असा या नावाचा अर्थ आहे. 

7/7

विरेंद्र सहवाग

Cricketers Baby Name And Meaning

विरेंद्र सहवागला दोन मुलं आहेत. या दोघांचे नाव आहे 'आर्यवीर' आणि 'वेदांत'.  आर्यवीर हा भारतीय शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ 'उत्तम' आहे आणि या नावाचा पर्यायी अर्थ 'सत्य' असा आहे. वेदांत या नावाचा अर्थ धर्मग्रंथ, आत्मसाक्षात्काराची वैदिक पद्धत, वेदांचा जाणता, धर्मशास्त्र, अंतिम सत्य, हिंदू तत्त्वज्ञान किंवा सर्वोच्च ज्ञान, सर्वांचा राजा.